ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्ये असं प्रथमच घडलं, इंग्लंडच्या नावावर 'हा' लाजिरवाणा विक्रम

ICC World Cup 2019 :  वेस्ट इंडिजकडून पहिल्याच सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करणाऱ्या पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत सोमवारी कमाल केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 10:33 AM2019-06-04T10:33:36+5:302019-06-04T10:57:04+5:30

whatsapp join usJoin us
ICC World Cup 2019 :  For the 1st time, England two players scored centuries in a World Cup defeat | ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्ये असं प्रथमच घडलं, इंग्लंडच्या नावावर 'हा' लाजिरवाणा विक्रम

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कपमध्ये असं प्रथमच घडलं, इंग्लंडच्या नावावर 'हा' लाजिरवाणा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वेस्ट इंडिजकडून पहिल्याच सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करणाऱ्या पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत सोमवारी कमाल केली. बेभरवशी पाकिस्तान संघाने यजमान इंग्लंडला पराभूत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या सामन्यात इंग्लंडने सर्वाधिक 6 वेळा 300+ धावा करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी केली, परंतु त्याचवेळी एक लाजिरवाणा विक्रमही नावावर केला. या सामन्यात इंग्लंडला 14 धावांनी पराभव पत्करावा लागला.


पाकिस्तानच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करताना संघाला 348 धावांचा पल्ला गाठून दिला. मोहम्मद हफिज ( 84), बाबर आजम ( 63), सर्फराज अहमद ( 55), इमाम उल हक ( 44) आणि फखर जमान ( 36) यांनी दमदार खेळ केला.  त्याच्या प्रत्युत्तरात जो रूट व जॉस बटलर यांनी शतकी खेळी केल्या. कर्णधार इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स आणि जेसन रॉय यांना अपयश आले. रूट व बटलर यांच्या शतकानंतरही इंग्लंडला 9 बाद 334 धावांपर्यंतच मजल मारता आली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात दोन फलंदाजांनी एकाच डावात शतक झळकावूनही पराभूत होणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरला. इंग्लंडने सलग सहाव्यांदा 300+ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाने 2007 मध्ये हा पराक्रम केला होता. 

पाकिस्तानने रचला नवा विक्रम
पहिल्या सामन्यात तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यात मात्र तिनशे धावांचा पल्ला गाठला. हा पल्ला गाठताना पाकिस्तानने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३४९ धावा केल्या. पण या सामन्यात पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नाही. एकाही खेळाडूने शतक न झळकावता पाकिस्तानने सर्वोच धावसंख्या रचण्याचा विक्रम विश्वचषकात प्रस्थापित केला आहे. कारण विश्वचषकात एकही शतक न झळकावता झालेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता.

दक्षिण आफ्रिकेने 2015 साली झालेल्या विश्वचषकात युएई संघाविरुद्ध एकही शतक न झळकावता 341 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेनंतर हा विक्रम पाकिस्तानच्याच नावावर होता आणि तो या विश्वचषकातच झाला होता. पाकिस्तानने 2015 साली झालेल्या विश्वचषकात युएई संघाविरुद्धच एकही शतक न झळकावता 339 धावा केल्या होत्या.

एकही शतक न झळकावता विश्वचषकात झालेल्या सर्वाधिक धावा
348/8 पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगहॅम, 2019
341/6 दक्षिण आफ्रिका विरुद्ध युएई, वेलिंगटन, 2015
339/6 पाकिस्तान विरुद्ध युएई, नेपिअर, 2015
338/5 पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, स्वेस्निया, 1983

Web Title: ICC World Cup 2019 :  For the 1st time, England two players scored centuries in a World Cup defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.