Join us

SL W vs NZ W : श्रीलंकेच्या बॉलिंग वेळी न्यूझीलंडऐवजी पावसाची बॅटिंग! कुणाला बसणार फटका?

पाऊस कुणासाठी ठरणार सेमीच्या वाटेतील अडथळा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 22:18 IST

Open in App

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनाही पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्याची वेळ आली. आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळण्यात आलेला १५ व्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने निर्धारित ५० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात २५८ धावा करत न्यूझीलंडसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. कर्णधार चामरी अटापट्टू ५३ (७२) आणि निलाक्षी डि सिल्वा ५५ (२८) यांच्या अर्शतकाशिवाय सलामीची बॅटर विश्मी गुणरत्ने ४२(८३) आणि हसिनी परेरा ४४(६१) यांनी उपयुक्त धावा केल्या. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

श्रीलंकेवर दुसऱ्यांदा आली ही वेळ; पाऊस ठरणार सेमीच्या वाटेतील अडथळा

पावसाच्या बॅटिंगमुळे दुसऱ्या डावातील खेळ न झाल्यामुळे सामना अखेर रद्द करण्यात आल्याची घोषणा झाली. श्रीलंकेवर दुसऱ्यांदा ही वेळ आली. आधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे त्यांनी खाते उघडले होते. आता सेमीसाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा असताना चांगली बॅटिंग करून श्रीलंकेच्या संघाला एका गुणावर समाधान मानावे लागले. सामना रद्द झाल्यामुळे मिळालेल्या एका गुणासह श्रीलंकेच्या खात्यात आता २ गुण जमा झाले आहेत. उर्वरित ३ सामने जिंकून श्रीलंकेचा संघ ८ गुणांपर्यंत पोहचू शकतो. पण त्यानंतरही त्यांना इतर संघाच्या निकालावर अवलंबून रहावे लागू शकते. 

ICC Womens World Cup 2025 Points Table: टीम इंडियासह कोणत्या संघासाठी कसे असेल सेमीचं समीकरण?

न्यूझीलंडच्या अडचणीही वाढल्या, कारण... 

न्यूझीलंडच्या संघाने पहिल्या ४ सामन्यातील फक्त एक विजय आणि श्रीलंके विरुद्धच्या अनिर्णित लढतीनंतर मिळालेल्या गुणासह ३ गुणांची कमाई केली आहे. हा संघ  गुणतालिकेत पाचव्या क्रमांकार आहे. सेमीसाठी पात्र ठरण्यासाठी त्यांना अव्वल चारमध्ये टिकण्यासाठी आता उर्वरित सर्वच्या सर्व सामने जिंकावे लागतील. जर एखादा सामना गमावला तर ते ८ गुणतालिकेत ८ चा आकडा गाठू शकणार नाहीत. त्यामुळे पाऊस हा त्यांच्यासाठी सेमीतील अडथळा ठरू शकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rain halts SL W vs NZ W; who faces the brunt?

Web Summary : Sri Lanka-New Zealand women's match abandoned due to rain. Sri Lanka scored 258/6. New Zealand's semi-final hopes now hinge on winning remaining matches; rain is a threat. SL needs to win all remaining matches to qualify.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५श्रीलंकान्यूझीलंडवन डे वर्ल्ड कप