Join us

आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी

रिचा घोषच्या ९४ धावांच्या खेळीवर भारी पडली नेडीन डि क्लर्कची ८४ धावांची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 23:49 IST

Open in App

 ICC Womens World Cup 2025  South Africa Women won by 3 wkts India Women : विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघावर पराभवाची वेळ आलीय. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३ विकेट्सनी सामना जिंकत टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक रोखली आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना आघाडीच्या फळीतील  बॅटर्सच्या फ्लॉप शोमुळं टीम इंडिया अडचणीत सापडली होती. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिचानं ९४ धावांची खेळी करत संघाचा वाचवलं. तिच्या या खेळीमुळे टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेसमोर २५२ धावांचे टार्गेट सेट केले. ज्या आठ क्रमांकानं वाचवल तोच डाव फिरला अन् दक्षि आफ्रिकेनं सामना जिंकला, असे काहीचे चित्र या सामन्यात पाहायला मिळाले. कारण दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही आठव्या क्रमांकावर बॅटिंग करणाऱ्या बॅटरच्या जोरावर हा सामना आपल्या खिशात घातला. रिचा घोषच्या ९४ धावांच्या खेळीवर  नेडीन डि क्लर्कची ८४ धावांची खेळी भारी पडली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दक्षिण आफ्रिकेच्या संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने सुरुवात चांगली केली. पण अर्धशतकी खेळीनंतर सलामी जोडी फुटली. स्मृती मानधना ३२ चेंडूत २३ धावा करून स्वस्तात माघारी फिरली. हरमनप्रीत, हरलीन देओल आणि जेमिमासह दीप्ती स्वस्तात माघारी फिरल्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. ६ बाद १०२ धावा अशी धावसंख्या असताना आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिजा घोषनं ७७ चेंडूत ९४ धावांची खेळी केली. तिला  स्नेह राणानं ३३ धावांसह उत्तम साथ दिली. त्यामुळे भारतीय संघाने आठव्या क्रमांकावरील बॅटरच्या दमदार खेळीच्या जोरावर २५१ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर २५२ धावांचे आव्हान ठेवले होते.   पण कमालीचा योगायोग जुळून आला अन् आठव्या क्रमांकाचा जाव टीम इंडियावर उलटा फिरला. हा की,  योगायोगानं हाच डाव उलटा फिरला. 

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Eighth batter saves, then South Africa reverses; India loses!

Web Summary : India faced defeat against South Africa in the ICC Women's World Cup. Despite Richa's valiant 94, South Africa chased down the target, winning by 3 wickets due to their lower-order batter's performance, ending India's winning streak.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारतीय महिला क्रिकेट संघ