Join us

SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी

७८ धावांवर दक्षिण आफ्रिकेचा अर्धा परतला होता तंबूत, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 01:14 IST

Open in App

ICC Womens World Cup 2025 South Africa Women won by 3 wkts Against Bangladesh Women : दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील १४ वा सामना खेळवण्यात आला. विशाखापट्टणमच्या मैदानातील दोन्ही संघातील सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झाला. शेवटी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३ विकेट्स राखून बाजी मारली. ज्या अख्तरनं संपूर्ण सामन्यात अचूक गोलंदाजीसह प्रतिस्पर्धी संघातील बॅटर्संना धावांसाठी संघर्ष करायला लावला तिला अखेरच्या षटकात ८ धावांचा बचाव करणं जमलं नाही अन् दोन अख्तरच्या भात्यातून आलेली अर्धशतके व्यर्थ ठरली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बांगलादेशच्या ताफ्यातील दोन अख्तरनं बॅटिंगमध्ये दाखवली धमक

या सामन्यात बांगलादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीच्या बॅटर्संनी अर्धशतकी भागीदारीसर  उत्तम सुरुवात करुन दिल्यावर शर्मिन अख्तर ५० (७७) शोर्णा अख्तर  ५१ (३५) यांनी दमदार अर्शतके झळकावली. दोघींच्या अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशच्या संघाने निर्धारित ५० षटकांत ६ विकेट्सच्या मोबदल्यात २३२ धावा करत दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर २३३ धावांचे लक्ष्य ठेवले होते.  

 ७८ धावांवर दक्षिण आफ्रिकेचा अर्धा परतला होता तंबूत, पण...

या धावसंख्येचा बचाव करताना बांगलादेशच्या संघाकडून नाहिदा अख्तर हिने पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर ब्रिट्स तांझिम ब्रिट्स हिला शून्यावर माघारी धाडले. रियाबा खान आणि रितू मोनी यांनीही उत्तम गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या अडचणी वाढवल्या. अवघ्या ७८ धावांवर दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत परतला होता. पण त्यानंतर मेरिझॅन कॅप आणि क्लोई ट्रायॉन जोडी जमली दोघींनी अर्धशतके झळकावत संघाला मॅचमध्ये आणले.

पहिल्या षटकात विकेट घेणाऱ्या अख्तरनं शेवटच्या ओव्हरमध्ये घालवली मॅच

मेरिझॅन कॅप हिने ७१ चेंडूत ५६ धावांची दमदार खेळी केली. नाहिदा अख्तरनेच  सेट झालेल्या या बॅटरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दुसऱ्या बाजूला क्लोई ट्रायॉन हिने ६९ चेंडूत ६२ धावांवर धाबवा झाली. रितू मौनीनं तिला रनआउट करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सातवा धक्का दिला. पण त्यानंतर नेडीन डि क्लर्क ३७(२९) आणि  मासाबाटा क्लास १०(१३) यांनी कोणतीही चू न करता शेवटपर्यंत नाबाद राहत संघाचा विजय निश्चित केला. शेवटच्या षटकात ८ धावांची गरज असताना अख्तर गोलंदाजीला  आलेल्या अख्तरच्या पहिल्याच चेंडूवर  नेडीन डि क्लर्क कडक चौकार मारत मॅच सेफ केली त्यानंतर एक चेंडू निर्धाव खेळल्यावर तिसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेच ३ चेंडू आणि ३ विकेट्स राखून संघाला विजय मिळवून दिला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : South Africa Women Edge Bangladesh in Thrilling World Cup Match

Web Summary : South Africa defeated Bangladesh in a tense World Cup match, winning by 3 wickets. Akhter's batting heroics went in vain as South Africa chased down the target, securing victory in the final over after a shaky start.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५द. आफ्रिकाबांगलादेश