ICC Womens World Cup 2025 South Africa Women won by 150 runs Against Pakistan : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील २२ वा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे आधी हा सामना प्रत्येकी ४०-४० षटकांचा करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ४० षटकात पाक गोलंदाजांची धुलाई करत ९ विकेट्सच्या मोबदल्यात ३१२ धावा केल्या. पुन्हा पावसाचा व्यत्यय आल्यामुळे २० षटकात पाकिस्तानच्या संघाला २३४ धावांचे टार्गेट मिळाले होते. पाकचा संघ या सुधारित २० षटकांच्या खेळात ७ विकेट्सच्या मोबदल्यात फक्त ८३ धावांपर्यंतच मजल मारू शकला. डकवर्थ लुईसप्रमाणे पाकचा १५० धावांनी लाजिरवाण्या पराभवासह स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महिला वर्ल्ड कप स्पर्धेतून बाद होणारा दुसरा संघ ठरला पाक
या सामन्यातील लाजिरवाण्या पराभवासह पाकिस्तान संघ महिला वर्ल्ड कप स्पर्धेतून बाद होणारा दुसरा संघ ठरला आहे. अधिकृतरित्या पाकच्या संघासमोर बादचा ठपका लागताच यंदाच्या हंगामातील सेमी फायनल आणि फायनलच्या लढती या भारतीय मैदानात होणार हे चित्रही आता स्पष्ट झाले आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानच्या सर्वच्या सर्व सामने श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जर पाकच्या संघाने चमत्कारिकरित्या सेमीफायनल आणि फायनलपर्यंत मजल मारली असती तर हे सामने श्रीलंकेच्या मैदानात खेळवण्याची वेळ आली असती. पण पाकिस्तानचा संघ बाद झाल्यामुळे आता तो प्रश्नच निकाली लागला आहे.
IND vs AUS : जिथं सचिन ठरला फुसका बार; तिथं धोनी-कोहलीनं केलाय धमाका! इथं पाहा खास रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचे शतक अवघ्या १० धावांनी हुकले
कोलंबोच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पाकिस्तान संघाची कर्णधार फातिमा सना हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेची सलामीची बॅटर तझमिन ब्रिट्स हिला शून्यावर माघारी धाडत पाकचा निर्णय सुरुवातीला यशस्वी ठरतोय असे दिसले. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लॉरा वॉल्व्हार्ड हिने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत पाकचे मनसुबे उधळून लावले. तिचे शतक अवघ्या १० धावांनी हुकले. पण तिने ८२ चेंडूत १० चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ९० धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिकेला मजबूत स्थितीत नेले. तिच्याशिवाय सुने लूस ६१ (५९) आणि मेरिझॅन कॅप ६८ (४३) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर अखेरच्या षटकात नेडीन डि क्लर्क हिने वादळी खेळीचा नजराणा पेश करताना १६ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४१ धावा कुटल्या. चौघींच्या दमदार खेळीच्या जोरावर ४० षटकात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ९ विकेट्सच्या मोबदल्यात ३१२ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून नश्रा संधू हिने आणि सादिका इक्बाल या दोघींनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. याशिवाय फातिमा सनाने एक विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातून बॅटिंगनंतर मेरिझॅन कॅप हिने गोलंदाजीतही सोडली छाप
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने डोंगराऐवढी धावसंख्या उभारल्यानंतर पाकिस्तानला फक्त २० ओव्हर मिळाल्या. त्यातही जे टार्गेट मिळाले होते ते २३४ धावांचे होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना सिद्रा अमीन १३ (२४), नतालिया परवेझ २० (२४) आणि सिद्रा नवाझ २२ (३३) या तिघींनीच दुहेरी आकडा गाठला. पाकिस्तानच्या संघाला २० षटकात फक्त ८३ धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून मेरिझॅन कॅप हिने सर्वाधिक ३ तर नॉनदुमिसू शंगासे हिने २ आणि अयाबाँगा खाका हिने एक विकेट घेतली.
Web Summary : Pakistan's defeat against South Africa in a rain-affected match eliminated them from the Women's World Cup. Chasing a revised target, Pakistan fell short. This loss confirms that the semi-finals and finals will likely be held in India.
Web Summary : दक्षिण अफ्रीका से बारिश से बाधित मैच में पाकिस्तान की हार के साथ ही महिला विश्व कप से उसका पत्ता कट गया। संशोधित लक्ष्य का पीछा करते हुए पाकिस्तान चूक गया। इस हार से सेमीफाइनल और फाइनल भारत में होने की संभावना प्रबल हो गई है।