Join us

RSA W vs ENG W : दक्षिण आफ्रिकेच्या नावे लाजिरवाणा विक्रम; २० वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं!

लाजिरवाण्या विक्रमाच्या यादीत पाकिस्तान पाठोपाठ  दक्षिण आफ्रिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 20:35 IST

Open in App

ICC Womens World Cup 2025  4th Match  England Womens won by 10 wkts  South Africa Womens :  आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील चौथ्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये सामना खेळवण्यात आला. गुवाहटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेला वनडे सामना टी-२० पेक्षा कमी वेळात निकाली लागला. पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका महिला संघ २०.४ षटकात ६९ धावांवर आटोपला. या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंड महिला संघाने १४.१ षटकात १० विकेट्स राखून अगदी सहज विजय नोंदवला. या सामन्यात निच्चांकी धावसंख्येसह महिला वनडे वर्ल्ड कपच्या २० वर्षांच्या इतिहासात जे घडलं नव्हतं ते पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

महिला वर्ल्ड कप स्पर्धेत मागील २० वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ ६९ धावांत आटोपला. महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या ठरली. एवढेच नाही तर आफ्रिकेच्या ताफ्यातील आघाडीच्या फळीतील पाच बॅटर्संपैकी एकीलाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. २० वर्षांच्या इतिहासात महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडलं.

वय ४० वर्षे १० दिवस, मात्र श्रीलंकन खेळाडूनं आपल्या बॉलिंगनं जगाला सांगितलं, वयाचा काय संबंध?

लाजिरवाण्या विक्रमाच्या यादीत पाकिस्तान पाठोपाठ  दक्षिण आफ्रिकामहिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ फक्त २०.४ षटकात ऑल आउट झाला. आतापर्यंतच्या महिला वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात कमी चेंडू खेळून ऑल आउट होणारा दक्षिण आफ्रिका हा दुसरा संघ ठरला. यादीत पाकिस्तान टॉपला आहे. १९९७ मध्ये हैदराबादच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पाक महिला संघाचा डाव १३.४ षटकात आटोपला होता. 

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात कमी षटकात ऑल आउट होणारे संघ

  • पाकिस्तान - १३.४ षटके विरुद्ध ऑस्ट्रेलिया (हैदराबाद, १९९७)
  • दक्षिण आफ्रिका - २०.४  षटके  विरुद्ध इंग्लंड  (गुवाहटी,  २०२५)
  • दक्षिण आफ्रिका - २२.१  षटके विरुद्ध न्यूझीलंड बाउरल, २००९)
  • नेदरलँड्स - २५.१  षटके  विरुद्ध ऑस्ट्रेलिया (पर्थ, १९८८) 

 

English
हिंदी सारांश
Web Title : South Africa Women's Cricket Team Faces Historic Low Against England.

Web Summary : South Africa Women suffered a humiliating defeat against England in the World Cup, collapsing to just 69 runs. This marks a historic low, with their top order failing and the team recording the second-lowest score in World Cup history. A forgettable performance for the Proteas.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५इंग्लंडद. आफ्रिकावन डे वर्ल्ड कप