ICC Womens World Cup 2025 Points Table Update : आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेची अडखळत सुरुवात करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बांगलादेशिविरुद्धची लढाई जिंकत टीम इंडियाला दणका दिला आहे. इंग्लंड विरुद्धच्या लढतीसह यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ६९ धावांवर ऑलआउट झाला होता. या सामन्यातील मानहानिकारक पराभवाच्या धक्क्यातून सावरत सलग तिसऱ्या विजयासह ४ सामन्यानंतर त्यांनी आपल्या खात्यात ६ गुण जमा करत तिसऱ्या स्थानावर कब्जा केला आहे. इथं एक नजर टाकुयात दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील लढतीनंतर गुणतालिकेत कोणता संघ कितव्या स्थानी आहे? सेमीसाठी टीम इंडियासह कोणत्या संघासाठी काय समीकरण? त्यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानी?
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील १४ व्या लढतीनंतर ऑस्ट्रेलिया संघ ४ पैकी ३ विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह ७ गुण मिळवत सर्वात आघाडीवर आहे. इंग्लंडच्या संघाने सलग तीन सामने जिंकले असून हा संघ ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेनं ४ सामन्यानंतर ६ गुणांची कमाई केली असून मायनस नेट रनरेटमुळे ते इंग्लंडच्या मागे राहिले आहेत.भारतीय संघाने ४ सामन्यातील २ विजय आणि २ पराभवासह ४ गुण कमावले असून अव्वल चारमध्ये स्थान कायम ठेवले आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेश प्रत्येकी २-२ गुणांसह अनुक्रमेपाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर असून श्रीलंका एका अनिर्णित सामन्यात मिळालेल्या १ गुणासह सातव्या तर पाकिस्तानचा संघ ३ सामन्यानंतरही खाते न उघडू शकल्याने तळाला आहे.
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
सेमीसाठी कोणत्या संघासाठी कसे असेल समीकरण?
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत प्रत्येक संघ एकमेकांसोबत प्रत्येकी एक सामना याप्रमाणे ७ सामने खेळणार आहे. गुणतालिकेतील अव्वल ४ संघ सेमीसाठी पात्र ठरतील.
- सध्याची परिस्थीतीत ऑस्ट्रेलियन संघाने ७ गुण आपल्या खात्यात जमा केले असून उर्वरित ३ सामन्यातील फक्त एक विजय त्यांना सेमीच तिकीट मिळवून देण्यासाठी पुरेसा ठरेल.
- इंग्लंडच्या संघाने सलग तीन विजय मिळवले आहेत. उर्वरित ४ पैकी २ सामन्यातील विजयासह ते आपलं स्थान सुनिश्चित करू शकतात.
- दक्षिण आफ्रिकेच्या संघाला उर्वरित ३ पैकी किमान दोन सामने जिंकावे लागतील. कारण त्यांचे नेटरनरेट मायनसमध्ये आहे. फक्त एक विजय त्यांना जर तरच्या समीकरणात अडकवू शकतो.
- टीम इंडियाला उर्वरित ३ सामन्यापेकी २ सामने जिंकावे लागतील. जर फक्त एक सामना जिंकला तर टीम इंडियासाठी सेमीचं समीकरण कठीण होऊन बसेल.
- न्यूझीलंडचा संघही अजून सेमीच्या शर्यतीत कायम आहे.उर्वरित ४ सामन्यात त्यांना किमान तीन सामन्यात विजय मिळवावा लागेल.
- बांगलादेशच्या संघाने उर्वरित सर्वच्या सर्व तीन सामने जिंकले तरी ते ८ गुणांपर्यंत पोहचतील. हे टास्क त्यांच्यासाठी सोपे नसेल.
- श्रीलंकेचा संघ उर्वरित सर्वच्या सर्व ४ सामने जिंकून ९ गुणांपर्यंत पोहचू शकतो. पण ते शक्य होईल असे वाटत नाही.
- पाकिस्तानच्या संघाचंही काही खरं नाही. उर्वरित ४ सामने जिंकले तरी त्यांना जर तरच्या समीकारणात अडकावे लागेल.