Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!

PAK W vs SL W : दोन्ही संघ सेमीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडले होते. पण हा सामना अनिर्णित राहिल्यामुळे पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढावली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 22:40 IST2025-10-24T22:33:23+5:302025-10-24T22:40:56+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC Womens World Cup 2025 PAK W vs SL W 25th Match No Result Due To Rain Pakistan Women Were Only Team Without A Win In This Tournament | Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!

Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!

ICC Womens World Cup 2025 Pakistan Women Only Team Without A Win : श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवरील पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यावर पावसाने पाणी फेरले. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील २५ व्या सामन्यासह यंदाच्या हंगामातील पाचवा सामना अनिर्णित राहिल्याचे पाहायला मिळआले. पाकिस्तानचा संघ शेवटच्या सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला. पण शेवटी ४.२ षटकानंतर सामना रद्द करुन दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

पाकिस्तानवर ओढावली मोठी नामुष्की

दोन्ही संघ सेमीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडले होते. पण हा सामना अनिर्णित राहिल्यामुळे पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढावली आहे.  ज्या पावसाने खाते उघडायला मदत केली त्याने शेवटी पाकची वाट लावली. ICC वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील ८ सहभागी संघापैकी पाकिस्तान हा एकमेव असा संघ ठरला ज्यांना एकही विजय मिळवता आला नाही. पावसामुळे शेवटचा सामना रद्द झाल्यामुळे त्यांची विजयाची पाटी कोरीच राहिली. पाकिस्तानच्या संघाने ७ पैकी ४ सामने गमावले तर ३ सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सामना रद्द झाला. त्यांच्याशिवाय सेमीच्या शर्यतीतून आउट झालेल्या श्रीलंकेसह न्यूझीलंड आणि बांगलादेशच्या संघाने प्रत्येकी १-१ सामना जिंकला.

Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?

आम्ही ४ वर्षे वर्ल्ड कपची वाट पाहतो, काय म्हणाली पाकची कर्णधार फातिमा सना?

 पावसामुळे आणखी एक सामना वाया गेल्यामुळे पाकिस्तानी कर्णधार फातिमा सना हिने ICC च्या नियोजानवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केल्याचे पाहायला मिळाले. साखळी फेरीतील शेवटचा सामना रद्द झाल्यावर कॅप्टनसह ताफ्यात निराशेचं वातावरण पाहायला मिळालं. फातिमा सना म्हणाली की, आम्ही उत्तम खेळ करण्याचा प्रयत्न केला. पण वातावरणामुळे खेळ बिघडला. आम्ही वर्ल्ड कपसाठी ४ वर्षे वाट पाहतो. पुढच्या वेळी आयसीसीने किमान तीन चांगल्या मैदानाची निवड करायला हवी. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या संघाला आम्ही चांगली टक्कर दिली. पण शेवटी घोळ झाला, असे सांगत, टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोत्तम देण्यासाठी उत्तम तयारी करू, असे ती म्हणाली आहे. 

श्रीलंकेच्या कर्णधाराला भारताचा पराभव जिव्हारी लागला 

श्रीलंकन कर्णधार चामरी अटापट्टू म्हणाली की, वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेत मोठ्या अपेक्षा असतात. पण दुर्देवाने भारत आणि इंग्लंडविरुद्ध आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. हे नियंत्रणात होते ते सर्व करण्याचा प्रयत्न केला. फलंदाजीसह क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीतील ज्या चुका झाल्या त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे म्हणत यंदाच्या वनडे वर्ल्ड कप मोहिमेतून सकारात्मक गोष्टीवर काम करू, असे ती म्हणाली आहे.
 

Web Title : बारिश ने धो दी पाकिस्तान की विश्व कप उम्मीदें, बिना जीत अभियान खत्म।

Web Summary : बारिश ने पाकिस्तान महिला विश्व कप को धो दिया, जिससे वे जीत हासिल करने में विफल रहीं। उम्मीदों के बावजूद, अंतिम मैच रद्द कर दिया गया। पाकिस्तान को निराशा का सामना करना पड़ा, टूर्नामेंट में एक भी जीत हासिल करने में विफल रहीं। कप्तान फातिमा सना ने बारिश के कारण एक और मैच गंवाने के बाद आईसीसी की योजना पर सवाल उठाया।

Web Title : Rain washes out Pakistan's World Cup hopes; winless campaign ends.

Web Summary : Rain ruined Pakistan Women's World Cup, leaving them winless. Despite hopes, the final match was abandoned. Pakistan faced disappointment, failing to secure a single victory in the tournament. Captain Fatima Sana questioned ICC's planning after another match was lost due to rain.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.