ICC Womens World Cup 2025 New Zealand Women Won By 100 Runs Bangladesh Women : महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडशिवाय एमेकव वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या न्यूझीलंडच्या संघाने दोन पराभवानंतर अखेर यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला. गुवाहटीच्या बारसापाराच्या मैदानात रंगलेल्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने निर्धारित ५० षटकात २०२७ धावा करत बांगलादेशच्या संघासमोर २२८ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ ३९.५ षटकात १२७ धावांवर आटोपला. १०० धावांनी विजय नोंदवत न्यूझीलंडच्या संघाने २ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे बांगलादेशचा संघ ३ सामन्यातील २ विजयासह २ गुण मिळत सहाव्या स्थानावर आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सोफीशिवाय ब्रूकची फिफ्टी
न्यूझीलंडची कर्णधार सोफिया डिव्हाइन हिने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर पहिल्या तीन बॅटर स्वस्तात माघारी फिरल्या. आपला निर्णय सार्थ ठरवण्यासाठी सोफीनं ८५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची खेळी केली. याशिवाय ब्रुक हालीडेनं १०४ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या.
बांगलादेशच्या ताफ्यातील आघाडीच्या फक्त तिघींनीच गाठला दुहेरी आकडा, इथंच मॅच फसली
न्यूझीलंडच्या संघानं दिलेल्या २२८ या धावंसख्येचा पाठलाग करताना बांगलादेशच्या ताफ्यातील आखाडीच्या पाच बॅटर्संना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. फातिमा खातुन हिने ८० चेंडूत केलेल्या ३४ धावा वगळता नाहिदा अख्तरनं ३२ चेंडूत १७ आणि राबेया खान हिने ३९ चेंडूत केलेल्या २५ धावा वगळता एकाही बॅटरचा निभाव लागला नाही. न्यूझीलंडच्या संघाकडून गोलंदाजीत जेस केर आणि लिया ताहुहु यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेत बांगालदेशचं कंबरडे मोडले. रोझमेरी मायर हिने २ तर अमेलिया केर आणि ब्रुक हालीडे यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.