Join us

ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट

पाक-न्यूझीलंड सामना रद्द अन् दक्षिण आफ्रिकेचा संघ फायद्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 23:39 IST

Open in App

ICC Women’s World Cup 2025  New Zealand and Pakistan Match Abandoned Due To Rain South Africa Qualify For Semis : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर सामनाही पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्याची वेळ आली. या सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सेमीचा मार्ग मोकळा झाला आहे. ५ सामन्यातील ४ विजयासह ८ गुण खात्यात जमा असणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ यंदाच्या हंगामात सेमी फायनलसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ठरला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

न्यूझीलंडचा संघ अजूनही सेमीच्या शर्यतीत कायम

कोलंबोच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २५ षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात ९२ धावा केल्या. पावसाच्या बॅटिंगमुळे खेळ थांबला अन् तो पुन्हा काही सुरु झाला नाही. शेवटी दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द झाल्यावर एक गुण मिळवणारा न्यूझीलंडचा संघ अजूनही सेमीच्या शर्यतीत टिकून आहे. पण पाकिस्तानच्या मात्र उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आल्या आहेत. या सामन्यानंतर सेमीसाठी पात्र ठरण्याचा मॅजिक फिगरचा आकडा हा ८ झाला आहे. न्यूझीलंडचा संघ उर्वरित दोन सामने जिंकून ८ गुणांपर्यंत पोहचू शकतो.  

Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर

पाक-न्यूझीलंड सामना रद्द अन् दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मिळाला फायदा 

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलियाच्या संघाने ५ सामन्यात ४ विजय आणि एका अनिर्णित सामन्यात मिळालेल्या एका गुणासह ९ गुण मिळवत सेमीचं पहिलं तिकीट मिळवलं.  उर्वरित तीन जागेंसाठी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, भारत आणि न्यूझीलंड यांच्या शर्यत होती. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्यामुळे आता हा संघ ८ गुणांपेक्षा अधिक गुण मिळवणार नाही हे निश्चित झालं अन्आ धीच ८ गुण मिळवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला त्याचा फायदा मिळाला.  

दोन जागेसाठी तिघांत स्पर्धा, त्यात भारत-न्यूझीलंडसाठी वाजली धोक्याची घंटा

ऑस्ट्रेलिया पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सेमीफायनल गाठल्यावर आता उर्वरित दोन जागांसाठी इंग्लंड, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात स्पर्धा असेल. इंग्लंडच्या संघाने ४ सामन्यातील ३ विजय आणि एका अनिर्णित लढतीसह ७ गुण आपल्या खात्यात जमा केले असून त्यांना सेमीचं तिकीट मिळवण्यासाठी उर्वरित ३ सामन्यांपैकी फक्त एक विजय पुरेसा ठरेल.  भारतीय संघ उर्वरित ३ सामन्यातील ३ विजयासह १० तर न्यूझीलंडचा संघ उर्वरित दोन सामन्यातील विजयासह ८ गुणांपर्यंत पोहचू शकतो. यातही हे दोन संघ  २३ ऑक्टोबरला एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. ही लढत सेमीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rain abandons PAK vs NZ; South Africa secures semi-final spot.

Web Summary : The Pakistan vs. New Zealand match was abandoned due to rain, granting South Africa a spot in the semi-finals of the ICC Women’s World Cup 2025. New Zealand remains in contention, while Pakistan is out of the race.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५द. आफ्रिकान्यूझीलंडपाकिस्तान