Join us

क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...

मिताली आणि ‘जेमिनी’चा पिच रिपोर्ट LIVE!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 22:28 IST

Open in App

ICC Womens World Cup 2025, IND W vs SA W Mithali Raj and Google Gemini Tell Pitch Report : बदलत्या काळासोबत क्रिकेटमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर झाल्याचे पाहायला मिळते. आत्याधुनिक क्रिकेटमध्ये पंचांचे काम सोपे करुन अचूक निर्णयासाठी तिसऱ्या पंचानंतर आपण या खेळात टेलिव्हिजन अंपायरच्या रुपात फोर्थ अंपायरला पाहिलं आहे. यानंतर निर्णय प्रक्रियेत अचूकता आणण्यासाठी क्रांती घडवणारी DRS प्रणाली आली. आता तंत्रज्ञानाच्या नव्या युगातील  स्मार्ट खेळाडू असलेल्या AI नं  क्रिकेटच्या मैदानात 'बोलंदीजी' करत सर्वांच लक्षवेधून घेतलं आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

क्रिकेटच्या मैदानात AI ची 'बोलंदाजी'; खेळपट्टी कुणाला साथ देणार?  मितालीनं थेट 'जेमिनी'ला विचारला प्रश्न अन्...

महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यात क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदाच AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.  भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात मिताली राजनं थेट गुगल 'जेमिनी'च्या साथीनं खेळपट्टीचं विश्लेषण केल्याचे पाहायला मिळाले. क्रिकेटच्या मैदानातील AI ची 'बोलंदाजी' सगळ्या जगाचं लक्षवेधून घेणारी ठरली.

शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला

मिताली आणि ‘जेमिनी’चा पिच रिपोर्ट LIVE!

महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांसाठी  स्टार स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री पॅनलचा भाग असलेली भारताची माजी कर्णधार मिताली राज खेळपट्टीचं विश्लेषण कऱण्यासाठी मैदानात उतरली. तिनं आपला मोबाईल काढला आणि गुगल 'जेमिनी' लाइव्ह फिचरचा वापर करत खेळपट्टीचं विश्लेषण सुरु केलं. आपण विशाखापट्टणच्या एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर आहोत. इथं उष्ण आणि दमट वातावरण आहे. खेळपट्टीबद्दल काय वाटते? असा प्रश्न मितालीनं थेट गुगल 'जेमिनी'ला विचारला. मोबाईलचा कॅमेरा खेळपट्टीकडे करताच मग 'जेमिनी' बोलू लागली. 

खेळपट्टीचं काही क्षणात अगदी अचूक विश्लेषण  

मिताली राजनं खेळपट्टीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गुगल 'जेमिनी'नं उत्तर दिले की, खेळपट्टी अगदी सपाट आहे. (पाट खेळपट्टी) त्यामुळे  खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल दिसत आहे. खेळपट्टीवर गवत खूपच कमी आहे. उष्ण आणि दमट हवानामुळे चेंडू स्विंग होणार नाही. खेळपट्टीवर मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. असा अंदाज गुगल 'जेमिनी'नं खेळपट्टीचं विश्लेषण केलं. मितालीनंही हा अंदाज योग्य असल्याचे मान्य केले. आयसीसीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला असून यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : AI bowls in cricket: Mithali Raj uses Gemini for pitch report.

Web Summary : Mithali Raj used Google Gemini to analyze the pitch during a Women's World Cup match between India and South Africa. Gemini predicted a flat, batting-friendly pitch with minimal swing due to heat and humidity, favoring high scores. This AI integration marks a new era in cricket analysis.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५भारतीय महिला क्रिकेट संघद. आफ्रिकामिताली राजआर्टिफिशिअल इंटेलिजन्स