ICC Womens World Cup 2025 India Women Pratika Rawal Equals World Record : भारताची सलामीची बॅटर प्रतीका रावल हिनं महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. महिला वनडे क्रिकेटध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करण्याचा मोठा पराक्रम तिने करून दाखवला आहे. २३ व्या डावात तिने महिला वनडेत १००० धावांचा टप्पा पार केला.
प्रतिका रावलची विश्व विक्रमाला गवसणी
या कामगिरीसह तिने ऑस्ट्रेलियन लिंडसे रेलर हिनं सेट केलेल्या विश्व विक्रमाची बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियन बॅटरनंही २३ डावात १००० धावांचा टप्पा गाठला होता. भारताकडून महिला क्रिकेटमध्ये सर्वात जलद हजार धावा करण्याचा विक्रम याआधी दीप्ती शर्माच्या नावे होता. तिने २९ डावात हजार धावा केल्या होत्या. हा विक्रम प्रतीका रावलनं मोडीत काढला आहे.
प्रतीकाचे वडील प्रदीप रावल दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बीसीसीआय प्रमाणित लेव्हल-१ अंपायर देखील आहेत. त्यांच्यामुळे बास्केटबॉलमधील गोल्ड मेडलिस्ट प्रतीका क्रिकेटकडे वळली. आज ती टीम इंडियासाठी सर्वोत्तम कामगिरी करताना दिसत आहे.
महिला वनडे क्रिकेटमधील सर्वात जलद १००० धावा करणाऱ्या खेळाडूंची यादी —
- लिंडसे रेलर (ऑस्ट्रेलिया) – २३ डाव
- प्रतीका रावल (भारत) – २३ डाव
- निकोल बोल्टन (ऑस्ट्रेलिया) – २५ डाव
- मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया) – २५ डाव
- बेलिंडा क्लार्क (ऑस्ट्रेलिया) – २७ डाव
- लॉरा वोल्वार्ड्ट (दक्षिण आफ्रिका) – २७ डाव