IND W Richa Ghosh Slams 94 Versus SA W Record : टीम इंडियातील विकेट किपर बॅटर रिचा घोष हिने विशाखापट्टणमच्या मैदानात पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीतील धमक दाखवून दिली. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून ती संघासाठी उपयुक्त धावा करताना दिसत आहे. सलग तिसऱ्या सामन्यात आघाडीच्या बॅटर्संनी फ्लॉप शो दिल्यावर रिचानं संकटात सापडलेल्या टीम इंडियाला अशक्यप्राय वाटत असलेल्या धावसंख्येचा टप्पा गाठून देणारी दमदार खेळी केली. तिचे शतक अवघ्या ६ धावांनी हुकले. पण तिच्या ९४ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाला दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारणं शक्य झाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वनडेत सर्वात जलदगतीने १००० धावांचा टप्पा गाठणारी तिसरी बॅटर ठरली रिचा
भारतीय महिला संघाने १०२ धावसंख्येवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. या परिस्थिती मैदानात दमदार फलंदाजी करताना रिषा घोष हिने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात ११ चौकार आणि ४ उत्तुंग षटकाराच्या मदतीने ७७ चेंडूत ९४ धावांची खेळी केली. या खेळीसह तिने महिला वनडेत १००० धावा करण्याचा टप्पाही पार केला. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने हा टप्पा गाठणारी ती तिसरी बॅटर ठरली आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाची एश्ले गार्डन आणि इंग्लंडची नॅट सायव्हर ब्रंट तिच्या पुढे आहे. गार्डन हिने ९१७ चेंडूत तर ब्रंटनं ९४३ चेंडूत वनडेत हजार धावसंख्येचा पल्ला गाठला होता. रिचानं १०१० चेंडूचा सामना करत हा मैलाला पल्ला पार केला.
बारावीच्या परीक्षेत ९२.५ टक्के गुण; बास्केटबॉलमध्ये गोल्ड! अंपायरची लेक कशी झाली टीम इंडियाची ओपनर?
स्नेह राणासोबत विक्रमी भागीदारी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात २५ व्या षटकात भारतीय संघाने १०२ धावांवर दीप्तीच्या रुपात सहावी विकेट गमावली. त्यानंतर रिचानं अमनजोत कौरच्या साथीनं सातव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर रिचा घोष हिने स्नेह राणासोबत आठव्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी रचली. भारतीय महिला संघाकडून आठव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर कोणत्याही बॅटर्संनी केलेली ही सर्वोच्च भागादीर ठरली. याआधी २०१८ मध्ये पूजा वस्त्राकर आणि सुषमा वर्मा यांनी २०१८ मध्ये ७६ धावांची भागीदारी रचल्याचा रेकॉर्ड होता. रिचा-स्नेहानं एक नवा विक्रम रचला आहे. रिचा घोष शिवाय स्नेह रणानं २४ चेंडूत केलेल्या ३३ धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने ४९.५ षटकात २५१ धावांपर्यंत मजल मारली.
अशी कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय विकेट किपर बॅटर
रिचानं वनडे कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झलकावले. ४६ व्या सामन्याील ४४ डावात तिने १००० धावांचा पल्ला गाठला. महिला वनडेत १००० धावांचा पल्ला गाठणारी ती १२ वी बॅटर आहे. पण विकेट किपर बॅटरच्या रुपात हा मैलाचा पल्ला गाठणारी ती अंजू जैन हिच्यानंतर दुसरी भारतीय ठरते. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रिचा अवघ्या २ धावांवर बाद झाली होती. पण त्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तिने २० चेंडूत नाबाद ३५ धावांची खेळी करत दमदार कमबॅक केले. आता ९४ धावांच्या खेळीसह तिने लोअर ऑर्डरमधील पॉवर दाखवून दिली आहे. ही भारतीय महिला संघासाठी यंदाच्या हंगामात मोठा दिलासा देणारी गोष्ट आहे.