Join us

ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का

इंग्लंडच्या सघाला धक्क्यावर धक्के, बांगलादेशच्या बाजूनं फिरली होती, मॅच पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 22:46 IST

Open in App

ICC Womens World Cup 2025,  Heather Knight Hit Show England Women Won By 4 Wkts Against Bangladesh Women :  महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा यशस्वी संघ असलेल्या इंग्लंडच्या संघाने गुवाहटीच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या बांगालदेशविरुद्धचा सामना अगदी सहज जिंकत यंदाच्या हंगामात सलग दुसरा विजय नोंदवला आहे. बांगलादेश महिला संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना सोभाना मोस्टरी (Sobhana Mostary) हिने १०८ चेंडूत केलेल्या ६० धावांच्या संयमी खेळीसह तळाच्या फलंदाजीत राबेया खान (Rabeya Khan) हिने तुफान फटकेबाजी करत २७ चेंडूत केलेल्या नाबाद ४३ धावांच्या खेळीच्या जोरावर ४९.४ षटकात १७८ धावा करत इंग्लंड महिला संघासमोर १७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

इंग्लंडच्या सघाला धक्क्यावर धक्के, बांगलादेशच्या बाजूनं फिरली होती, मॅच पण...

या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. संघाच्या धावफलकावर अवघ्या ६ धावा असताना सलामीची बॅटर एमी जोन्स पहिल्याच षटकात अवघ्या एका धावेवर बाद झाली. टॅमी ब्युमाँटच्या रुपात बांगलादेशच्या संघाने इंग्लंडला २९ धावांवर दुसरा धक्का दिला. तिने १७ चेंडूत १३ धावा केल्या. हेदर नाइटनं (Heather Knight) सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत कर्णधार नॅट सायव्हर ब्रंटच्या साथीनं ३० धावांटी भागीदारी रचली. ही जोडी फुटल्यावर इंग्लंडनं ठराविक अंतराने विकेट गमावल्या. बांगलादेशच्या संघाने इंग्लंडला अडचणीत आणले होते. पण हेदर नाइट शेवटपर्यंत थांबली. तिने आधी ॲलिस कॅप्सी (Alice Capsey) २० (३१) च्या साथीनं संघाला विजयाच्या दिशनं नेलं. त्यानंतर चार्ली डीन (Charlie Dean) २७ (५६)* हिने सुंदर खेळी केली. हेदरनं १११ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ७९ धावांची नाबाद खेळी करत संघाला २३ चेंडू आणि ४ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

कोण आहे Ravi Kalpana? ३ डावात फक्त ४ धावा! तरी मितालीसह स्टेडियम स्टँडला का दिलं तिचं नाव?

बांगलादेशला पराभूत करत इंग्लंडनं टीम इंडियाला दिला दणका

महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या विरुद्धच्या सलग दोन विजयासह ४ गुण कमावत गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले होते. इंग्लंडच्या संघाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातील सलग दुसऱ्या विजयासह ४ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या आणि मोठ्या विजयासह इंग्लंडनं उत्तम नेट रनरेटच्या जोरावर भारतीय संघाला अव्वलस्थानावरुन खाली खेचत नंबर वनर कब्जा केला आहे. ऑस्ट्रेलियन संघ २ सामन्यानंतर १ विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह ३ गुण मिळवून या यादीत तिसऱ्या स्थानावर तर  बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रत्येकी २-२ गुणांसह टॉप ५ मध्ये आहे. 

न्यूझीलंडसह पाकिस्तानला अजून भोपळा नाही फुटला

श्रीलंकेच्या संघाने अजून एकही विजय मिळवलेला नाही. पण ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे त्यांच्या खात्यात १ गुण जमा झाला आहे.   न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत तळाला आहे. दोन्ही संघांनी आपापले पहिले दोन्ही सामने गमावले आहेत. ते अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Heather Knight shines as England defeats Bangladesh, edges past India.

Web Summary : England defeated Bangladesh in the ICC Women's World Cup, with Heather Knight's unbeaten 79 leading them to victory. This win puts England ahead of India in the standings due to a superior net run rate, despite both teams having four points.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५इंग्लंडबांगलादेशवन डे वर्ल्ड कप