ICC Womens World Cup 2025 Bangladesh Women Won Against Pakistan Women: श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात बांगलादेश महिला संघाने पाकिस्तान महिला संघाचा धुव्वा उडवला. पाकिस्तानच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशच्या ताफ्यात एक नव्हे तीन अख्तरचा जलवा दिसला अन् त्यांच्यासमोर पाकिस्तानचा डाव फसवा ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्याच षटकात पाकच्या ताफ्यातील दोघींच्या पदरी 'गोल्डन डक'ची नामुष्की
पाकिस्तानच्या डावातील पहिल्याच षटकात मारफा अख्तर हिने पाचव्या चेंडूवर उमेमा सोहेल हिला शून्यावर बाद केले. तिची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेली सिद्रा अमीनही हजेरी लावून परतली. पहिल्या षटकात पाकच्या ताफ्यातील दोघींच्या पदरी गोल्डन डकची नामुष्की ओढावली. परिणामी पहिल्या षटकातच पाकिस्तान महिला संघाची अवस्ता २ विकेट्सच्या मोबदल्यात २ धावा अशी बिकट झाली होती. ठराविक अंतराने विकेट्स पडण्याचा सिलसिला कायम राहिला अन् पाकिस्तानचा संघ स्वस्तात आटोपला.
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
पाक संघ १२९ धावांवर ऑलआउट
पाकिस्तानची सलामीची बॅटर मुनीबी अली १७ (३५), रमीन शमीम २३(३९), सिद्रा नवाझ १५ (२०), कर्णधार फतिमा सना २२ (३३) आणि डायना बेग १६ (२२) या पाच जणींशिवाय पाकच्या ताफ्यातील अन्य कुणालाच दुहेरी आकडाही गाठता आला नाही. परिणामी पाकिस्तानचा संघ ३८.३ षटकात १२९ धावांवर ऑलआउट झाला.
बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर अन्... मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
बांगलादेशच्या संघाकडून मारुफा अख्तर हिने ७ षटकात ३१ धावा खर्च करताना २ विकेट्स घेतल्या. याशिवाय नाहिदा अख्तरनं ८ षटकात १९ धावा खर्च करत २ तर सोशोर्णा अख्तर हिने ३.३ षटकात ५ धावा खर्च करत सर्वाधिक ३ विकेट्सचा डाव साधला. गोलंदाजीत या तिघीचा जलवा हा पाकिस्तानच्या संघाची लक्तरे काढणारा ठरला. याशिवाय फातिमा खातुन, रबेया खान आणि निशिता अख्तर निशी यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. पाकिस्तानच्या संघाने दिलेल्या १३० धावांचा पाठलाग करताना रुबेया हैदरनं७७ चेंडूत नाबाद ५४ धावांची खेळी केली. शरमन अख्तर १०(३०), निगार सुलाताना २३ (४४) आणि सोभाना मोस्टरी २४ (१९)* यांनी उपयुक्त योगदान दिले.
Web Summary : Bangladesh Women defeated Pakistan in the World Cup, thanks to a stellar bowling performance. Three Akhtars spearheaded the attack, restricting Pakistan to a paltry 129. Bangladesh chased the target comfortably, securing a dominant victory with ease.
Web Summary : बांग्लादेश महिला टीम ने शानदार गेंदबाजी से पाकिस्तान को वर्ल्ड कप में हराया। तीन अख्तरों ने पाकिस्तान को 129 रनों पर रोक दिया। बांग्लादेश ने आसानी से लक्ष्य का पीछा करते हुए शानदार जीत हासिल की।