Join us

ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल

 भारतीय संघासाठी सेमीचा पेपर झाला अवघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 18:36 IST

Open in App

ICC Womens World Cup 2025 Australia Beat South Africa And Meet India In 2nd Semi Final : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील २६ व्या सामन्यातील निकालानंतर सेमीफायनलमध्ये कोणता संघ कोणाविरुद्ध भिडणार ते चित्र स्पष्ट झाले आहे. इंदूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ७ विकेट्सनी मात दिली. या विजयासह ऑस्ट्रेलिय संघाने गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियन संघाचे तगडे आव्हान असणार आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ऑस्ट्रेलियन संघाने अगदी सहज जिंकला सामना

अलाना किंग हिच्या फिरकीच्या जोरावर पहिल्यांदा गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ९७ धावांवर रोखले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्स गमावल्या. पण शेवटी १६ व्या षटकात विजयी डाव साधत अपराजित राहून गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघ अव्वलस्थानी पोहचला. धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाकडून जॉर्जिया वोल हिने ३८ चेंडूत नाबाद ३८ धावांची खेळी केली. याशिवाय बेथ मूनी हिने  ४१ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले.

AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

 भारतीय संघासाठी सेमीचा पेपर झाला अवघड

ऑस्ट्रेलिया संघाने सर्वाधिक वेळा वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली असून यंदाच्या हंगामात वर्ल्ड कप उंचावण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी टीम इंडियाला आता ऑस्ट्रेलियाला मात द्यावी लागेल. जर भारतीय संघाने ही लढाई जिंकली, तर निश्चितच टीम इंडिया फायनल बाजीही अगदी सहज मारेल.३० ऑक्टोबरला नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या स्टेडियवर भारत-ऑ्स्ट्रेलिया यांच्यात यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा सामना खेळवण्यात येईल.

पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंड-दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगणार थरार

गुवाहटीच्या बारासपारा क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिली सेमीफायनल खेळवण्यात येईल. २९ ऑक्टोहरला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी ३ वाजता हा सामना नियोजित आहे. दोन्ही सेमीफायनलमधील विजते संघ यंदाच्या हंगामातील जेतेपदासाठी २ नोव्हेंबरला एकमेकांविरुद्ध भिडतील.

English
हिंदी सारांश
Web Title : India vs Australia in ICC Women's World Cup 2025 Semifinal!

Web Summary : Australia defeated South Africa, securing a semifinal clash with India in the ICC Women's World Cup 2025. The match will be held in Navi Mumbai. England faces South Africa in the other semifinal.