ICC Womens World Cup 2025 Alyssa Healy Out Of England Clash : महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दोन शतकी खेळीसह खास छाप सोडणारी ऑस्ट्रेलियन कर्णधारावर पुढच्या सामन्यातून संघाबाहेर होण्याची वेळ आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात बुधवारी २२ ऑक्टोबरला इंदूरच्या मैदानात सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्याला मोठा धक्का बसला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बॅक टू बॅक शतकी खेळीसह तेवर दाखवलं, पण आता...
ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हीली नेट प्रॅक्टिस वेळी दुखापतग्रस्त झाली आहे. तिच्या पिंडरीला इजा झाली असून इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तिच्याऐवजी ऑलराउंडर ताहलिया मॅकग्रा ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करेल, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक शेली निश्चेके यांनी दिली आहे. एलिसान भारतीय संघापाठोपाठ बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळीसह विक्रमी कामगिरी नोंदवली होती.
SL W vs BAN W : ४ चेंडूत ४ विकेट्स! तरीही श्रीलंकन गोलंदाजाला मिळाली नाही हॅटट्रिक; कारण...
यंदाच्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी बॅटर आहे एलिसा
ऑस्ट्रेलिया महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक शेली निश्चेके यांनी मंगळवारी इंग्लंड विरुद्धच्या सामन्याआधी पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियन कर्णधार पुढच्या सामन्याला मुकणार असल्याची माहिती सांगितली. दुर्देवी रित्या एलिसा हिली इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. सरावा दरम्यान तिच्या पिंडरीला दुखापत झाली आहे. ही दुखापत किरकोळ असल्याचा उल्लेख करत लवकरच ती पुन्हा मैदानात उतरण्यास सज्ज असेल, असेही ते म्हणाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करणाऱ्या एलिसानं चार डावात दोन शतकाच्या मदतीने २९४ धावा केल्या आहेत. ती यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणारी बॅटर आहे. तिच्या अनुपस्थितीत जॉर्जिया वोल ही फोबे लिचफील्डच्या साथीनं ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करताना दिसू शकते.
नंबर वनची लढाई
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दोन्ही संघांनी आतापर्यंत स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. दोन्ही संघांनी प्रत्येकी ४-४ सामने जिंकले असून पावसामुळे दोन्ही संघाच्या खात्यात एका मॅचमध्ये १-१ गुण खात्यात जमा झाला आहे. दोन्ही संघांनी सेमीच तिकीट पक्के केले आहे. आता त्यांच्यातील लढाई ही नंबर वनसाठी असेल. जो संघ जिंकेल, तो गुणतालिकेत अव्वलस्थानावर पोहचेल.