Join us

ICC Women's Under-19 T20 World Cup Final : अफलातून कॅच, भेदक गोलंदाजी! भारताच्या पोरींसमोर इंग्लंडने टेकले गुडघे, ४३ धावांत ६ बाद, Video 

ICC Women's Under-19 T20 World Cup Final : शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षांखालील मुलींनी वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये दमदार कामगिरी केली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 18:14 IST

Open in App

ICC Women's Under-19 T20 World Cup Final : शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षांखालील मुलींनी वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय मिळवणाऱ्या इंग्लंडची फायनलमध्ये घसरगुंडी झालेली पाहायला मिळतेय. तितास संधू, अर्चना देवी व पार्श्वी चोप्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत इंग्लंडच्या मुलींच्या संघाची अवस्था ६ बाद ४३ अशी केली. गोंगाडी त्रिशाने अफलातून झेल घेतला.

संधूने पहिल्याच षटकात इंग्लंडच्या लिबर्टी हीपला ( ०) स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या षटकात अर्चना देवीने इंग्लंडच्या निआम्ह हॉलंडचा ( १०) त्रिफळा उडवला. कर्णधार ग्रेस स्क्रीव्हन्सला ( ४) देवीने बाद करून इंग्लंडला मोठा धक्का दिला. संधूने सामन्यातील दुसरी विकेट घेताना सेरेन स्मेलची विकेट घेतली. त्यानंतर चोप्राने दोन धक्के दिले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारतीय महिला क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंड
Open in App