Join us  

India VS Bangladesh : भारताचा बांगलादेशवर १८ धावांनी दमदार विजय

India VS Bangladesh | ICC Women's T20 World Cup 2020 : भारताने बांगलादेशला एकामागून एक धक्के दिले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून पुनम यादवने भेदक मारा करत तीन बळी मिळवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 7:41 PM

Open in App

प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारता आली नसली तरी भेदल गोलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशवर दमदार विजय मिळवला. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने चांगली सुरुवात केली होती. पण त्यानंतर भारताने बांगलादेशला एकामागून एक धक्के दिले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून पुनम यादवने भेदक मारा करत तीन बळी मिळवले. भारताने यावेळी बांगलादेशवर र१८ धावांनी विजय

blob:https://www.t20worldcup.com/4999d806-d23c-48ad-a826-574398968261

बांगलादेशने भेदक मारा करत भारताच्या धावसंख्येला वेसण घातल्याचे पाहायला मिळाले. पण शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रीगेझ यांनी साकारलेल्या दमदार खेळींमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी भारताला दुसऱ्या षटकात पहिला धक्का बसला. पण त्यानंतर शेफाली आणि जेमिमा यांनी दमदार फलंदाजी करत भारताला अर्धशतक पूर्ण करून दिले. पण या दोघींनाही अर्धशतक झळकावण्यात अपयश आहे.

शेफाली आणि जेमिमा ही जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारून देइल, असे वाटत होते. पण शेफाली बाद झाली आणि ही जोडी फुटली. शेफालीने यावेळी आक्रमक फलंदाजी करत १२ चेंडूंत २ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ३९ धावा केल्या.

शेफाली बाद झाल्यावर जेमिमाने संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पण जेमिमाला दुसऱ्या टोकाकडून चागंली साथ मिळाली नाही. दुसऱ्या टोकाकडून भारतीय फलंदाज बाद होत राहीले आणि या गोष्टीचे दडपण जेमिमावर आले. या दडपणाखाली जेमिमाही धावचीत झाली. जेमिमाने दोन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३४ धावा केल्या.

टॅग्स :महिला टी-२० क्रिकेटआयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020भारतबांगलादेश