Join us  

चॅम्पियन्स ट्रॉफी 20 षटकांची व्हावी, ही तर आयसीसीची इच्छा; बीसीसीआयचा मात्र विरोध

चॅम्पियन्स ट्रॉफी 1998 साली सुरु करण्यात आली होती. यापूर्वी 2013 आणि 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये खेळवण्यात आली होती. 2021 साली होणाऱ्या स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे. ही स्पर्धा 50 षटकांची न खेळवता 20 षटकांची खेळवावी, असा प्रस्ताव आयसीसीने संलग्न देशांपुढे ठेवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 9:06 PM

Open in App
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी ही स्पर्धा भारतातून दुसऱ्या देशात खेळवण्याचा घाट आयसीसीने घातला होता

दुबई : आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही 20 षटकांची व्हावी, अशी आयसीसीची इच्छा आहे. ही स्पर्धा भारतामध्ये 2021 साली होणार आहे. पण बीसीसीआयने आयसीसीच्या या प्रस्तावाला जोरदार विरोध केला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 1998 साली सुरु करण्यात आली होती. यापूर्वी 2013 आणि 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफी इंग्लंडमध्ये खेळवण्यात आली होती. 2021 साली होणाऱ्या स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्यात आले आहे. ही स्पर्धा 50 षटकांची न खेळवता 20 षटकांची खेळवावी, असा प्रस्ताव आयसीसीने संलग्न देशांपुढे ठेवला आहे. पण बीसीसीआयने मात्र या गोष्टीला कडाडून विरोध केला आहे.

" चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आयसीसीला काही बदल करायचे आहेत. काही दिवसांपूर्वी ही स्पर्धा भारतातून दुसऱ्या देशात खेळवण्याचा घाट आयसीसीने घातला होता, पण त्यामध्ये ते अपयशी ठरले होते. आता त्यांनी ही स्पर्धा 20 षटकांची खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला आयसीसीचा हा निर्णय पटलेला नाही. त्यामुळे या प्रस्तावाला बीसीसीआयचा विरोधच असेल," असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

टॅग्स :बीसीसीआयआयसीसी