ICC Under 19 World Cup 2026 Vaibhav Suryavanshi Fifty Semifinal vs Afghanistan : हरारेच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये वैभव सूर्यवंशीनं वादळी अर्धशतकासह टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. अफगाणिस्तानच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना दोन शतकवीरांच्या जोरावर सेमीची लढाई ३०० पारची केली. अफगाणिस्तानच्या संघाने ठेवलेल्या ३११ धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीनं पुन्हा एकदा आपल्या भात्यातील स्फोटक फटकेबाजीचा नजराणा पेश केला. अवघ्या २४ चेंडूत त्याने अर्धसतकाला गवसणी घातली. २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं धावा करताना त्याने षटकार चौकारांची अक्षरश: 'बरसात' केली. षटकार मारूनच त्याने अर्धशतक साजरे केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैभव अर्धशतकानंतर अडखळला, पण...
अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेतील या अर्धशतकाचे तो शतकात रुपांतर करेल, असे वाटत होते. पण नूरिस्टानी ओमरझाई याने ६८ धावांवरच त्याच्या खेळीला ब्रेक लावला. वैभवची मोठी खेळी करण्याची संधी हुकली. पण त्याने ३३ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने २०६.च्या स्ट्राइक रेटनं धावा करत भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन दिली. वैभवनं जॉर्जच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी ५४ चेंडूत ९० धावांची भागादीरी रचली.
U19 World Cup Semifinal : अफगाणिस्तानकडून दोन शतकवीर! फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला हव्या ३११ धावा
अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरे अर्धशतक
वैभव सूर्यवंशीची अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेतील हे तिसरे अर्धशतक आहे. साखळी फेरीतील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने पहिले अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात त्याने ६७ चेंडूत ७२ धावांची खेळी केली होती. सुपर सिक्समध्ये त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात ३२ चेंडूत ५२ धावा केल्या होत्या. तिसऱ्या प्रयत्नातही तो शतकापासून वंचित राहिला. पण या खेळीसह त्याने यंदाच्याहंगामात २०० धावांचा आकडा पार केला आहे. ६ सामन्यातील ६ डावात त्याच्या खात्यात २६४ धावा जमा आहेत.
Web Summary : Vaibhav Suryavanshi's blistering half-century gave India a strong start in the U19 World Cup semi-final against Afghanistan. Chasing 311, Suryavanshi smashed a rapid fifty off just 24 balls, hitting a flurry of sixes and fours at a strike rate exceeding 200.
Web Summary : वैभव सूर्यवंशी के तूफानी अर्धशतक ने अफगानिस्तान के खिलाफ अंडर-19 विश्व कप सेमीफाइनल में भारत को मजबूत शुरुआत दी। 311 रनों का पीछा करते हुए, सूर्यवंशी ने सिर्फ 24 गेंदों में तेजी से अर्धशतक बनाया, जिसमें 200 से अधिक की स्ट्राइक रेट से छक्के और चौके शामिल थे।