ICC U19 World Cup 2026 IND vs ENG live Streaming : अंडर १९ वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील फायनलमध्ये भारत-इंग्लंड यांच्यात जेतेपदाची लढत रंगणार आहे. दोन्ही संघांनी यंदाच्या हंगामात अपराजित राहून फायनल गाठली आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे. भारतीय संघ दहाव्यांदा फायनलमध्ये पोहचला असून सहाव्या जेतेपदासह ते या स्पर्धेत सर्वाधिक वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाची बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. दुसरीकडे इंग्लंडचा युवा संघ दुसऱ्यांदा ट्रॉफी उंचावण्यासाठी प्रयत्नशील असेल. इथं एक नजर टाकुयात कुठे अन् कधी रंगणार फायनलचा थरार? कसा पाहता येईल हा सामना यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टीम इंडियानं विक्रमी विजयासह गाठली आहे फायनल
थॉमस रेव्ह यांच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने उपांत्य फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात कर्णधार थॉमस रेव्हने नेतृत्वाला साजेशी खेळी करत शतकी खेळी साकारली होती. दुसऱ्या बाजूला आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध विक्रमी ३११ धावांचा यशस्वी पाठलाग करत फायनलमध्ये धडक मारली आहे.
बाप्पा... वर्ल्डकप जिंकू दे! कोच गौतम गंभीर T20 World Cup 2026 आधी सिद्धिविनायकाच्या चरणी!
सामना कधी आणि कुठं रंगणार?
अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-इंग्लंड यांच्यातील फायनल सामना झिम्बाब्वेतील हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. अर्धा तास अगोदर दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.
कुठं आणि कसा पाहता येईल फायनलचा थरार?
भारत आणि इंग्लंड युवा संघातील फायनल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. याशिवाय जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवरही क्रिकेट चाहते लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून या मेगा फायनलचा थरार पाहू शकतील.
भारत अंडर १९ संघ : एरॉन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), आरएस अंब्रिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, हरवंश पंगालिया, मोहम्मद एनान, किशन कुमार, मोहम्मद एनान, किलन पटेल.
इंग्लंड अंडर १९ संघ :
बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स, बेन मेएस, थॉमस र्यू (यष्टीरक्षक), कॅलेब फाल्कोनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लुम्सडेन, ॲलेक्स फ्रेंच, ॲलेक्स ग्रीन, आयझॅक मोहम्मद, ल्यूक हँड्स, विल बेनिसन, अली फारूक.
Web Summary : India and England will clash in the U19 World Cup final. India aims for its sixth title, while England seeks its second. The match will be held in Harare and broadcast on Star Sports and Jio Hotstar.
Web Summary : अंडर 19 विश्व कप फाइनल में भारत और इंग्लैंड का मुकाबला होगा। भारत का लक्ष्य छठा खिताब है, जबकि इंग्लैंड दूसरे की तलाश में है। यह मैच हरारे में होगा और स्टार स्पोर्ट्स और जियो हॉटस्टार पर प्रसारित किया जाएगा।