Join us  

U19 World Cup final : विश्वचषक विजयाचे हे आहेत पाच शिल्पकार

आयसीसी अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारताने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2018 2:44 PM

Open in App

मुंबई-आयसीसी अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारताने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरलं.   फायनल मॅचमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव केला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 217 धावांचं आव्हान ठेवंलं होतं. या आव्हानाचा सामना करत टीम इंडियाने शानदार खेळी केली. भारताने 38.5 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून  220 रन्स केले. 

हे आहेत भारताच्या विजयाचे पाच शिल्पकार

- पृथ्वी शॉअंडर 19 भारतीय टीमचा कॅप्टन पृथ्वी शॉने सामन्यात कमालीचं प्रदर्शन केलं. त्याने भारताचं उत्तम नेतृत्व करत 6 मॅचेसमध्ये 5 डावात एकुण 261 रन्स केले. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

- मनजोत कालराभारतीय अंडर 19 टीमचा ओपनर मनजोत कालराने फायनल मॅचमध्ये शानदार शतक झळकावलं. त्याने 102 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये 8 चौकार व 3 शतकांचा समावेश आहे. ओपनिंग करायला उतरलेल्या मनजोत कालराने मैदानात उतरल्यापासून त्याच्या उत्कृष्ट खेळीचं दर्शन घडवलं. त्याला फायनल सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. 

- शुभमन गिलभारतीय अंडर 19 संघातील धडाकेबाज बॅट्समन शुभमन गिलने टुर्नामेंटम्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकं लगावली. गिलने 6 सामन्यातील पाच डावात 124 च्या सरासरीने एकुण 372 रन्स केले.

- कमलेश नगरकोटीभारतीय टीमचा पेसर कमलेश नगरकोटीने टुर्नामेंटमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं. कमलेशने फायनल मॅचमध्ये दोन विकेट घेतल्या तर संपूर्ण टुर्नामेंटमध्ये त्याने एकुण 9 विकेट्स घेतल्या. 

- अनुकूल रॉयस्पिनर अनुकूल रॉयने त्याच्या जबरदस्त बॉलिंगच्या जोरावर सगळ्यांनाच प्रभावित केलं. रॉयने 6 मॅचेसमध्ये अकुण 14 विकेट्स घेतल्या. टुर्नामेंटमध्ये सर्वाधीक विकेट घेणार बॉलर तो बनला आहे.  

टॅग्स :19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाभारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढतक्रिकेटभारतीय क्रिकेट संघ