Join us

आयसीसी कसोटी क्रमवारीत कोहलीचे दुसरे स्थान कायम

ख्रिस वोक्स, शान मसूद यांची मोठी झेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 06:58 IST

Open in App

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) रविवारी जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ आणि भारताचा कर्णधार विराट कोहली अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी कायम आहेत. त्याचवेळी, इंग्लंड-पाकिस्तान दरम्यान झालेल्या पहिल्या कसोटीत शानदार फलंदाजी करणाºया ख्रिस वोक्स आणि शान मसूद यांनी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.फलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा केन विलियम्सन तिसऱ्या स्थानी कायम आहे. अव्वल दहा फलंदाजांमध्ये भारताचे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे अनुक्रमे आठव्या आणि दहाव्या स्थानी आहेत. तसेच, पाकिस्तानचा बाबर आझम सहाव्या, तर इंग्लंडचा कर्णधार जो रुट नवव्या स्थानी कायम आहेत.पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अपयशी ठरलेला अष्टपैलू बेन स्टोक्सची चौथ्या स्थानावरुन सातव्यास्थानी घसरण झाली आहे.तसेच इंग्लंडविरुद्ध १५६ धावांची शानदार खेळी करणाºया मसूदने १४ स्थानांनी झेप घेताना कारकिर्दीत सर्वोत्तम १९वे स्थान मिळवले. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत निर्णायक अष्टपैलू खेळ केलेल्या ख्रिस वोक्सनेही १८ स्थांनी सुधारणा करत ७८वे स्थान मिळवले. त्याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत वोक्स सातव्या स्थानी पोहचला आहे.गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये आॅस्टेÑलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा अव्वल स्थानी कायम असून भारताचा वेगवान गोलंदाज् जसप्रीत बुमराह याने आपले आठवे स्थान कायम राखले आहे. गोलंदाजांमध्ये अव्वल दहामध्ये बुमराह एकमेव भारतीय आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड हा तिसºया स्थानी असून दुसºया स्थानावरील न्यूझीलंडचा नील वॅगरन याच्या तुलनेत तो केवळ सात गुणांनी मागे आहे. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर याने दोन स्थानांनी सुधारणा करत ३७वे स्थान मिळवले आहे. (वृत्तसंस्था)भारताचे अव्वल स्थान कायमजागतिक कसोटी अजिंक्यपद क्रमवारीत भारताने सर्वाधिक ३६० गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. त्याचवेळी, इंग्लंडने २६६ गुणांसह तिसरे स्थान आणखी मजबूत केले आहे. आॅस्टेÑलिया दुसºया स्थानी असून इंग्लंड केवळ ३० गुणांनी त्यांच्याहून मागे आहे. यानंतर न्यूझीलंड (१८०) आणि पाकिस्तान (१४०) अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत.अष्टपैलूंमध्ये फारसे बदल नाहीअष्टपैलू खेळाडूंमधील अव्वल पाच स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. इंग्लंडचा बेन स्टोक्स अव्वल स्थानी असून त्यानंतर वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर आणि भारताचा रवींद्र जडेजा यांचा क्रमांक आहे. आॅस्टेÑलियाचा मिचेल स्टार्क चौथ्या स्थानी आहे, तर भारताचा अनुभवी रविचंद्रन अश्विन पाचव्या स्थानावर आहे.

टॅग्स :विराट कोहली