Join us  

ICC Test rankings: मालिका पराभवाचा भारताला धक्का; इंग्लंडला बढती

ICC Test rankings: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत धक्का बसला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 11:19 AM

Open in App

लंडनः इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत धक्का बसला. भारताला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-4 अशी हार पत्करावी लागली. त्यामुळे भारताच्या खात्यातील 10 गुण वजा झाले. आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय संघ 115 धावांवर अव्वल स्थानावर कायम आहे. इंग्लंडला मात्र एका स्थानाची बढती मिळाली आहे. 

मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा संघ 97 गुणांसह पाचव्या स्थानी होता आणि या मालिका विजयानंतर त्यांनी 105 गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यांनी न्यूझीलंडला (102) मागे टाकले. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी 106 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

(India vs England Test: भारतीय संघ म्हणजे बडा घर पोकळ वासा... )

 फलंदाज आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत फार बदल झालेले नाही. भारताचा कर्णधार विराट कोहली 937 गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( 929) आणि न्यूझीलंडचा केन विल्यम्सन ( 847) हे आहेत. विराटने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 593 धावा केल्या. इंग्लंडमध्ये एका मालिकेत 500 हून अधिक धावा करणारा तो आशियातील पहिला कर्णधार ठरला आहे. 

(अॅलिस्टर कुकला इंग्लंडचा विजयी निरोप, टीम इंडियाचा 118 धावांनी पराभव)

ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा याचा सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने (564) मोडला. त्याने गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. अँडरसनच्या खात्यात 896 गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा ( 882) दुसऱ्या, तर भारताचा रवींद्र जडेजा ( 832) तिसऱ्या स्थानावर आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआयसीसीविराट कोहली