नवी दिल्ली, दि. 1 - नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघानं आपले प्रथम स्थान कायम राखलं आहे. गोलंदाजीमध्ये भारतीय अष्टपैलू रविंद्र जडेजाने आपले प्रथम स्थान तर आर. अश्वनंने दुसरे स्थान कायम ठेवलं आहे. लंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत धडाकेबाज शतकी खेळी करणाऱ्या शिखऱ धवनने फलंदाजीच्या क्रमवारीत २१ स्थानाची झेप घेत ३९ व्या स्थानावर विराजमान झाला आहे. कसोटी क्रमवारीत पहिल्या 10 गोलंदाजामध्ये अश्विन आणि जडेजा व्यतिरीक्त एकही खेळाडू नाही. शमी गोलंदाजीच्या क्रमवारीत 23 व्या स्थानी आहे. हेरथ तिसऱ्या स्थानावर तर अँडरसन चौथ्या आणि हेजलवुड पाचव्या क्रमांकावर आहेत. अष्टपैलू खेळाडूमध्ये बांगलादेशचा शाकिब अल हसन पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर भारताचे जडेजा आणि अश्विन कायम आहेत. तिसऱ्या स्थानावर मोईन अली आहे. तर पाचव्या स्थानावर बेन स्टोक आहे.
फलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ प्रथम स्थानावर विराजमान आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुट दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा चेतेश्वर पुजारा चौथ्या स्थावर आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थावर आहे. पहिल्या दहा फलंदाजामध्ये भारताचे फक्त दोन फलंदाज आहेत.
आयसीसी कसोटी क्रमवारी
भारत 123
दक्षिण आफ्रिका 117
ऑस्ट्रेलिया 100
इंग्लंड 99
न्यूजीलँड 97
पाकिस्तान 93
श्रीलंका 92
८. वेस्ट इंडिज 75
बांगलादेश 69
आयसीसी कसोटी गोलंदाज क्रमवारी
रवींद्र जडेजा 897
आर अश्विन 849
रंगना हेराथ 828
आयसीसी कसोटी फलंदाज क्रमवारी
स्टिव्ह स्मिथ 941
ज्यो रूट 885
विल्यमसन 880
चेतेश्वर पुजारा 866
विराट कोहली 826
आयसीसी कसोटी अष्टपैलू क्रमवारी
शाकिब-उल-हसन 431
रवींद्र जडेजा 414
आर अश्विन 413