किंग्सटाऊन - बांगलादेश आणि नेदरलँड्स टी-२० विश्वचषकात सुपर आठमध्ये पोहोचण्याची आशा कायम राखण्याच्या निश्चयाने गुरुवारी आमने-सामने येतील. दक्षिण आफ्रिकाने ड गटात अव्वल राहत पुढच्या फेरीतील प्रवेश निश्चित केला. बांगलादेश या गटात दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश आणि नेदरलँड्सचे समान दोन गुण आहेत.
बांगलादेशने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला दोन गड्यांनी नमवले होते. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना चार धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
नेदरलँड्सचा संघही मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाला होता. आता त्यांचाही पुनरागमन करण्याचा प्रयत्न असेल.
सामन्याची वेळ : रात्री ८:०० वाजता. (भारतीय वेळेनुसार)