ICC T20 World Cup South Africa Wins vs Afghanistan In Double Super Over : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात कल्पनिकडचा थरार पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दिलेल्या १८८ धावांचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात एक विकेट हातात असताना 'करो वा मरो'च्या लढतीत १३ धावांची गरज होती. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून अखेरचं षटक घेऊन आलेल्या कगिसो रबाडाने आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. पण हा चेंडू अंपायरनं नो बॉल ठरवला अन् अफगाणिस्तानसाठी एक संधी निर्माण झाली. पुढच्या तीन चेंडूवर ११ धावा करत नूरनं सामना अफगाणिस्तानच्या बाजूनं वळवला. अखेरच्या ३ चेंडूवर दोन धावा असताना असताना नूर अहमद स्ट्राइकवर होता. रबाडाने टाकलेल्या दुसऱ्या नो बॉलमुळे फ्री हिटवर सामना संपवण्याची त्याला संधी होती. पण फझलहक फारूखी दुसरी धाव घेताना रन आउट झाला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये नवे ट्विस्ट
सामन्यातील अखेरच्या षटकात रबाडाने टाकलेल्या दोन नो बॉलनंतर रनआउटचं ट्विस्ट पाहायला मिळाले. मग सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या संघाने १८ धावांचे टार्गेट सेट केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका बॅकफूटवर गेला. पण एका चेंडूत ७ धावांची गरज असताना सामन्यात ट्रिस्टन स्टब्सनं सामन्यात आणखी एक ट्विस्ट आणले. नवा ट्विस्ट आला. सुपर ओव्हरमधील फझलहक फारूखीच्या अखेरच्या चेंडूवर षटकार मारला आणि सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटला. परिणाम या सामन्याचा निकाल लावण्यासाठी दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली.
SA vs AFG : ट्विस्टवर ट्विस्ट! विजयी धाव घेताना फ्री हिटवर रनआउट अन् सामना सुपर ओव्हरमध्ये गेला
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानचा निर्णय फसला, अन् त्यांनी सामना गमावला
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अझमतुल्लाह ओमरझाई घेऊन आलेल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारत ट्रिस्टन स्टप्बसनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. दुसऱ्या चेंडूवर त्याने एकेरी धाव घेतल्यावर डेविल मिलरनं आधी तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली. त्यानंतर त्याच्या भात्यातून सलग दोन षटकार आले. शेवटच्या चेंडूवर दुहेरी धावा घेत या षटकात २३ धावा काढत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अफगाणिस्तानसमोर २४ धावांचे टार्गेट सेट केले.
अफगाणिस्तानची मोठी चूक अन् पराभवासह स्पर्धेबाहेर पडण्याची वेळ
या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव फसला. मोहम्मद नबी एक चेंडू निर्धाव खेळून दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. अखेरच्या ४ चेंडूत २४ धावांची गरज असताना गुरबाझ फलंदाजीला आला. केशव महाराजच्या षटकात सलग तीन षटकार मारून त्याने पुन्हा एकदा या सामन्यात ट्विस्ट आणले. त्यात केशव महाराजनं वाइडच्या रुपात एक अवांतर धाव दिली. एक चौकार सामन्यात तिसऱ्या सुपर ओव्हरच ट्विस्ट आणू शकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण तो शेवच्या षटकात झेलबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाने हा सामना जिंकला. या सामन्यातील पराभवासह अफगाणिस्तानचे यंदाच्या हंगामातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. मोहम्मद नबीच्या जागी गुरबाझ फलंदाजीला पाठवले असते तर कदाचित हा सामना जिंकून अफगाणिस्तान स्पर्धेत तरला असता, पण महत्त्वाच्या सामन्यात मोक्याच्या क्षणी अफगाणिस्तानने केलेला प्रयोग फसला.