ICC T20 World Cup Pakistan Qualification Scenario For Semi Final : श्रीलंकेतील पलेक्केलेच्या मैदानात टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील दुसऱ्या गटातील इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील लढत रंगली होती. या सामन्यातील विजयासह इंग्लंडच्या संघाने सलग दुसऱ्या विजयासह ४ गुण आपल्या खात्यात जमा करत सेमीफायनलचं तिकीट पक्के केले. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाचं सेमीचं समीकरण अवघड झालं आहे. पहिल्या गटात भारतीय संघ एक सामना गमावल्यामध्ये मोठ्या 'जर तर'च्या समीकरणात अडकला असताना दुसऱ्या गटात पावसाचा फटका आणि इंग्लंडनं दिलेल्या पराभवाच्या धक्क्यामुळे पाकिस्तानची अवस्था ही टीम इंडियापेक्षाही बिकट झाली आहे. इथं जाणून घेऊयात सविस्तर...
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
...म्हणून इंग्लंडचा संघ चार गुण मिळताच सेमीसाठी ठरला पात्र
इंग्लंडनं सेमीच तिकीट पक्के केल्यावर आता पाकिस्तानसह न्यूझीलंड आणि श्रीलंका हे तीन संघ दुसऱ्या गटातून सेमीच्या शर्यतीत आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे दोन्ही संघाच्या खात्यात प्रत्येकी १-१ गुण जमा आहे. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाला पहिल्या सामन्यात इंग्लंडने पराभवाचा दणका दिला आहे. आता श्रीलंकेचा संघ या गटात न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध खेळणार आहे. हे दोन्ही सामने जिंकले तरी ते ४ गुणांपर्यंतच पोहचू शकतात. न्यूझीलंडचा संघाचेही दोन सामने बाकी असून तेही ४ गुणांपर्यंत पोहचू शकतात. त्यामुळेच इंग्लंडचा संघ ४ गुण मिळवताच सेमीफायनलसाठी पात्र ठरला.
पाकिस्तानची अवस्था टीम इंडियापेक्षाही बिकट
सुपर ८ फेरीतील पहिल्या गटात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर उर्वरित दोन सामने जिंकूनही अन्य संघाच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यातही वेस्ट इंडिजच्या संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बाजी मारली तर नेट रन रेटचा मुद्दा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकतो. पण टीम इंडिया उर्वरित सामने जिंकून ४ गुणांपर्यंत पोहचू शकतो. याउलट दुसऱ्या गटात पाकिस्तानची अवस्था अधिक बिकट आहे. कारण खात्यात एक गुण आणि एक सामना जिंकूनही ते फक्त ३ गुणांपर्यंत मजल मारू शकतात. २८ फेब्रुवारीला पाकिस्तानचा संघ सुपर ८ मधील आपला शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना गमावला तर ते स्पर्धेतून बाहेर होतील. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघही त्यांच्या वाटेतील मोठा अडथळा आहे. कारण २ सामने जिंकत तेही ४ गुणांपर्यंत पोहचू शकतात. श्रीलंकाही पाकिस्तानसह न्यूझीलंडला पराभूत करून ४ गुणांपर्यंत पोहचू शकते. या दोन संघांतील शर्यतीत पाकिस्तानचा निभाव लागणं मुश्किलच आहे.
पाकिस्तानसाठी सेमीचं समीकरण
- श्रीलंकेच्या संघाने न्यूझीलंडला पराभूत केले तर श्रीलंकविरुद्धचा शेवटचा सामना जिंकून पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. पण त्यासाठी न्यूझीलंडच्या संघाला इंग्लंडनेही पराभवाचा धक्का द्यायला हवा. या परिस्थितीतही नेट रनरेट हा महत्त्वाचा फॅक्टर ठरेल.
- श्रीलंकेसह न्यूझीलंड हे दोन्ही संघ आपले उर्वरित सर्व सामने जिंकून स्वबळावर सेमीच तिकीट मिळवू शकतात. श्रीलंकेत पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे या गटातील सेमीचा दुसरा संघ ठरवताना आणखी काही ट्विस्टही पाहायला मिळू शकते.
Web Summary : England's victory impacts Pakistan's T20 World Cup semifinal chances, making qualification surprisingly simpler than India's. Pakistan needs to win against Sri Lanka, considering net run rate depending on the New Zealand-Sri Lanka result. A loss or rain could change everything.
Web Summary : इंग्लैंड की जीत से पाकिस्तान के टी20 विश्व कप सेमीफाइनल की संभावनाओं पर असर पड़ा है, जिससे क्वालिफिकेशन भारत की तुलना में आसान हो गया है। पाकिस्तान को श्रीलंका के खिलाफ जीत की जरूरत है, न्यूजीलैंड-श्रीलंका के परिणाम के आधार पर नेट रन रेट पर विचार करना होगा। हार या बारिश सब कुछ बदल सकती है।