USA vs Pakistan, ICC T20 World Cup Matches Today Live Streaming Full Details टी २० वर्ल्ड कप २०२६ चा चौथ्या दिवसातील ट्रिपल हेडरच्या लढतीत पाकिस्तान विरुद्ध अमेरिका या लढतीवर सर्वांच्या नजरा असतील. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा डाव फसल्यामुळे पाकिस्तान मैदानात उतरण्याआधीच पराभूत झाले आहे. त्यात आता अमेरिकेचा संघ गत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करत पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळणार का? ते पाहण्याजोगे असेल. इथं एक नजर टाकुया चौथ्या दिवसातील ट्रिपल हेडर लढतींमध्ये कोणता संघ कुणाविरुद्ध भिडणार? हे सामने कसे पाहता येतील? यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेदरलँड्स विरुद्ध नामिबिया
- वेळ: सकाळी ११.00 वाजता
- सामन्याचे ठिकाण : दिल्ली
दिल्लीतील या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात नामिबिया आणि नेदरलँड्स आमनेसामने येणार आहेत. पाकिस्तानविरुद्ध अत्यंत अटीतटीचा सामना गमावल्यानंतर नेदरलँड्सचा संघ थोडासा निराश असला तरी, त्या सामन्यातील कामगिरी कायम राखली तर डच संघाला आघाडी मिळू शकते. दोन्ही संघांमध्ये सामना जिंकण्याची समान क्षमता असल्याने हा सामना चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे.
IND vs PAK: रवी शास्त्रींचे बाबर आझमला 'ओपन चॅलेंज', म्हणाले- "पहिल्या ५ चेंडूंमध्ये..."
नामिबिया संघ:
मलान क्रुगर, जान फ्रायलिन्क, जान निकोल लॉफ्टी-इटन, लॉरेन स्टीनकॅम्प, गेरहार्ड एरॅस्मस (कर्णधार), जेजे स्मिथ, रुबेन ट्रम्पेलमन, झेन ग्रीन (यष्टीरक्षक), जान बाल्ट, बर्नार्ड स्कॉल्ट्झ, बेन शिकोंगो, डायलन लेचर, जॅक ब्रासेल, विलेम मायबर्ग, मॅक्स हायंगो
नेदरलँड्स संघ:
मायकेल लेविट, मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, कॉलिन अॅकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/यष्टीरक्षक), झॅक लायन कॅशेट, लोगन व्हॅन बेक, आर्यन दत्त, रूएलॉफ व्हॅन डर मर्व्हे, काइल क्लाइन, पॉल व्हॅन मीकरेन, टिम व्हॅन डर गग्टन, साकिब झुल्फिकार, फ्रेड क्लासेन, नोआ क्रोएस
न्यूझीलंड विरुद्ध यूएई
- वेळ: दुपारी ३.00 वाजता
- सामन्याचे ठिकाण : चेन्नई
यूएईचा पहिलाच सामना थेट बलाढ्य न्यूझीलंड संघाविरुद्ध होणार आहे. न्यूझीलंडने आपल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला असून, हा संघ या सामन्यातही विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र, यूएईकडेही काही प्रतिभावंत खेळाडू आहेत आणि त्यांनी एकत्रित चांगली कामगिरी केली, तर मोठा उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
न्यूझीलंड संघ :
टिम सिफर्ट (यष्टीरक्षक), फिन अॅलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिचेल, मिचेल सँटनर (कर्णधार), जेम्स नीशम, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी, ईश सोढी, काइल जेमीसन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हन कॉनवे
संयुक्त अरब अमिराती (यूएई) संघ :
आर्यांश शर्मा (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम (कर्णधार), मोहम्मद झोहेब, अलीशान शरफू, हर्षित कौशिक, मयंक कुमार, ध्रुव पराशर, मोहम्मद अरफान, हैदर अली, जुनैद सिद्दीकी, मोहम्मद जवदुल्ला, मोहम्मद रोहीद खान, सिमरनजित सिंग, सोहैब खान, मोहम्मद फारूक
पाकिस्तान विरुद्ध अमेरिका
- वेळ: सायंकाळी ७.०० वाजता
- सामन्याचे ठिकाण : कोलंबो
पहिल्याच सामन्यात अमेरिकेने भारतासमोर मोठे आव्हान उभे केले होते आणि आता मागील वर्ल्ड कपप्रमाणे पाकिस्तानविरुद्ध पुन्हा एकदा मोठा निकाल लावण्याच्या इराद्याने अमेरिका मैदानात उतरेल. पाकिस्तान कोणत्याही संघाला हरवू शकतो, पण त्याचबरोबर कोणत्याही संघाकडून पराभूतही होऊ शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पाकिस्तान हा सामना मागील लढतीतील विजयाच्या आत्मविश्वासावर खेळणार आहे, तर अमेरिका अद्याप आपल्या पहिल्या गुणाच्या शोधात आहे. अमेरिकन फलंदाजांनी जर पाकिस्तानच्या फिरकीपटूंना विकेट्स घेण्यापासून रोखले, तर सामना अतिशय अटीतटीचा ठरू शकतो. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघासाठी सुपर ८ फेरीतील प्रवेश जवळपास अशक्य होईल.
पाकिस्तान संघ:
सईम अय्युब, साहिबजादा फरहान, सलमान आघा (कर्णधार), बाबर आझम, उस्मान खान (यष्टीरक्षक), शादाब खान, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सलमान मिर्झा, अबरार अहमद, फखर झमान, नसीम शाह, ख्वाजा नफाय, उस्मान तारीक
अमेरिका संघ:
अँड्रिस गॉस (यष्टीरक्षक), सैतेजा मुक्कमल्ला, मोनांक पटेल (कर्णधार), मिलिंद कुमार, संजय कृष्णमूर्ती, शुभम रंजन, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसिन, शॅडली व्हॅन स्काल्कविक, अली खान, सौरभ नेत्रावळकर, शेहान जयसूर्या, नॉस्थुष केंजिगे, जसदीप सिंग, शयान जहांगीर
टी २० वर्ल्ड कप २०२६ लाईव्ह प्रसारण
टी २० वर्ल्ड कप २०२६ मधील सामने भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील. तर या सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाईटवर उपलब्ध असेल.