ICC T20 WCup 2026 Harry Brook Century : पाकिस्तान विरुद्ध हॅरी ब्रूकची विक्रमी सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला पहिला

हॅरी ब्रूकनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन दमदार खेळीसह संघाला सेमीच तिकीट मिळवून देणारी खेळी साकारली.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 22:22 IST2026-02-24T22:19:40+5:302026-02-24T22:22:32+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup IND vs PAK Super 8 Match Harry Brook's record-breaking century Against Pakistan First Captain Do It In World Cup History | ICC T20 WCup 2026 Harry Brook Century : पाकिस्तान विरुद्ध हॅरी ब्रूकची विक्रमी सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला पहिला

ICC T20 WCup 2026 Harry Brook Century : पाकिस्तान विरुद्ध हॅरी ब्रूकची विक्रमी सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला पहिला

ICC T20 World Cup 2026 Harry Brook Century : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील  पल्लेकेलेच्या मैदानातील सुपर ८ मधील  पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने दमदार शतक झळकावले आहे. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात शतकी खेळी करणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे. पाकिस्तानच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. पण हॅरी ब्रूकनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन दमदार खेळीसह संघाला सेमीच तिकीट मिळवून देणारी खेळी केली.  

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

टी-२० वर्ल्डपच्या आतापर्यंतच्या ९ हंगामात एकाही कर्णधाराला या स्पर्धेत शतक झळकावता आले नव्हते. हॅरी ब्रूकनं धावांचा पाठलाग करताना हा पराक्रम करून दाखवला आहे. त्याने ५१ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०० धावा केल्या. शाहीन शाह आफ्रिदीने त्याला बोल्ड करण्याआधी त्याने आपले काम केले होते.   हॅरी ब्रूक याने शतकी खेळीसह संघाला सेमीच तिकीट मिळवून दिले. एवढेच नाहीतर आंतरराष्ट्रीय २० कारकिर्दीतील पहिले शतक झळकावताना त्याने अन्य काही विक्रम आपल्या नावे केले आहेत. इंग्लंडच्या संघाकडून तिन्ही प्रकारात शतक झळकवणारा जोस बटलर आणि डेविड मलान यांच्यानंतर तो तिसरा बॅटर ठरला आहे. १०० धावांच्या खेळीसह इंग्लंडच्या संघाकडून वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च खेळी इंग्लंडच्या बॅटरच्या एलिट क्लबमध्येही त्याने एन्ट्री मारली आहे.

टी-२० वर्ल्ड कपमध्ये धावांचा पाठलाग करताना शतकवीर ठरलेले खेळाडू

  • ११६* अ‍ॅलेक्स हेल्स विरुद्ध श्रीलंका, २०१४
  • १००*  ख्रिस गेल  विरुद्ध इंग्लंड, २०१६
  • १००* पथुम निसंका  विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२६
  • १०० हॅरी ब्रूक विरुद्ध पाकिस्तान, २०२६*


इंग्लंडसाठी टी-२० वर्ल्ड कपमधील सर्वोच्च वैयक्तिक धावा

  • ११६* – अ‍ॅलेक्स हेल्स विरुद्ध श्रीलंका, चटगाव, २०१४
  • १०१* –  जोस बटलर) विरुद्ध श्रीलंका, शारजाह, २०२१
  • १०० – हॅरी ब्रूक विरुद्ध पाकिस्तान, पल्लेकेले, २०२६*
  • ९९* –  ल्यूक राईट) विरुद्ध अफगाणिस्तान, कोलंबो (RPS), २०१२
     

इंग्लंडकडून क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकवणारे खेळाडू 

  • जोस बटलर
  • डेव्हिड मलान)
  • हॅरी ब्रूक

Web Title : हैरी ब्रूक का शतक: T20 WCup में शतक बनाने वाले पहले कप्तान!

Web Summary : पाकिस्तान के खिलाफ हैरी ब्रूक के शतक ने इंग्लैंड को टी20 विश्व कप के सेमीफाइनल में पहुंचाया। टी20 विश्व कप इतिहास में यह उपलब्धि हासिल करने वाले वह पहले कप्तान बने।

Web Title : Harry Brook's Century: First Captain to Score a T20 WCup Century!

Web Summary : Harry Brook's century against Pakistan propels England towards the T20 World Cup semi-finals. He becomes the first captain to achieve this feat in T20 World Cup history after England's shaky start.