ZIM vs WI : हेटमायरची वादळी खेळी; ख्रिस गेलचा जलद सेंच्युरीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची होती संधी, पण...

गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड होता टप्प्यात, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 20:47 IST2026-02-23T20:44:27+5:302026-02-23T20:47:32+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup 2026 ZIM vs WI Shimron Hetmyer Storms To Fastest Fifty By A West Indies Batter In T20 World Cup History Miss Broken Chris Gayle Fastest Hundreds Record | ZIM vs WI : हेटमायरची वादळी खेळी; ख्रिस गेलचा जलद सेंच्युरीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची होती संधी, पण...

ZIM vs WI : हेटमायरची वादळी खेळी; ख्रिस गेलचा जलद सेंच्युरीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची होती संधी, पण...

ICC T20 World Cup 2026, ZIM vs WI 44th Super 8 Match Shimron Hetmyer Fastest Fifty By A West Indies : टी-२० वर्ल्ड कप २०५ स्पर्धेतील झिम्बाब्वे विरुद्धच्या सुपर ८ मधील लढतीत वेस्ट इंडिजचा धाकड फलंदाज शिमरॉन हेटमायर याने  विक्रमी अर्धशतक झळकावले. मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करताना तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हेटमायरनं १९ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या संघाकडून कोणत्याही बॅटरनं केलेली ही सर्वात जलद अर्धशतकी खेळी ठरली. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात जलद शतकी खेळी करणाऱ्या गेलला जे जमलं नाही ते या पठ्ठानं करून दाखवलं.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड होता टप्प्यात, पण...

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या संघाकडून सर्वात जलद अर्धशतक झळकावल्यावर हेटमायरला या स्पर्धेतील युनिवर्सल बॉस ख्रिस गेलचा जलद शतकी विक्रम मोडण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली.  ग्रेम क्रेमरनं ब्रायन बेनेटकरवी त्याच्या वादळी खेळीला ब्रेक लावला. हेटमायरनं ३४ चेंडूत ७ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८५ धावांची खेळी केली. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वात जलद शतकी खेळीचा रेकॉर्ड हा ख्रिस गेलच्या नावे आहे. २०१६ च्या हंगामात गेलनं इंग्लंडविरुद्ध ४७ चेंडूत शतक झळकावले होते.    

एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाशी बरोबरी

शिमरॉन हेटमायर याने झिम्बाब्वे विरुद्धच्या वानखेडेच्या मैदानात ७ उत्तुंग षटकार ठोकले. यंदाच्या हंगामात आतापर्यंत त्याच्या बॅटमधून १७ षटकार पाहायला मिळाले आहेत. या कामगिरीसह त्याने निकोलस पूरनच्या विक्रमाशी बरोबरीचा डाव साधला. २०२४ च्या हंगामात पूरनने एका हंगामात १७ षटकार मारले होते.  २०१२ च्या हंगामात क्रिस गेलनं १६ तर २०२४ च्या हंगामात रहमनुल्लाह गुरबाझ याने १६ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.

Web Title : हेटमायर की तूफानी पारी: गेल का रिकॉर्ड तोड़ने का मौका चूके

Web Summary : जिम्बाब्वे के खिलाफ शिमरोन हेटमायर की तूफानी अर्धशतक ने क्रिस गेल के सबसे तेज टी20 विश्व कप शतक के रिकॉर्ड को तोड़ने का मौका गंवा दिया। उन्होंने 34 गेंदों में 85 रन बनाए, जिसमें सात चौके और सात छक्के शामिल थे, लेकिन 2016 के गेल के 47 गेंदों के शतक को पार करने से चूक गए।

Web Title : Hetmyer's Stormy Innings: Missed Opportunity to Break Gayle's Record

Web Summary : Shimron Hetmyer's blistering fifty against Zimbabwe nearly broke Chris Gayle's fastest T20 World Cup century record. He scored 85 off 34 balls, including seven fours and seven sixes, before being dismissed, missing the chance to surpass Gayle's 47-ball century from 2016.