Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NED : 'अब तक सतरा'; टीम इंडिया सगळ्यांसाठीच खतरा! नेदरलँड्सला पराभूत करत वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम

नेदरलँड्स विरुद्धचा सामना १७ धावांनी जिंकत टीम इंडियाने आयसीसी स्पर्धेतील सलग १७ व्या विजयाची नोंद करत आपला वर्ल्ड रेकॉर्ड आणखी भक्कम केला आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 22:45 IST

Open in App

ICC T20 World Cup 2026, India vs Netherlands, 36th Match : शिवम दुबेच्या स्फोटक खेळीनंतर गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीच्या फिरकीच्या जादूच्या जोरावर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यातही भारतीय संघाने बाजी मारली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या  भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १९३ धावा करत नेदरलँड्सच्या संघासमोर १९४ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १७६ धावांपर्यंतच मजल मारू शकला. हा १७ धावांनी जिंकत टीम इंडियाने आयसीसी स्पर्धेतील सलग १७ व्या विजयाची नोंद करत आपला वर्ल्ड रेकॉर्ड आणखी भक्कम केला आहे.  ICC स्पर्धेतील सलग १७ विजयात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग १२ विजयासह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सलग पाच विजयांचा समावेश आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

चार सामन्यात दुसऱ्यांदा वरुण चक्रवर्ती हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर पोहचला, पण...

भारतीय संघाने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना नेदरलँड्सच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण धावफलकावर ३५ धावा लागल्या असताना वरुण चक्रवर्तीनं ही जोडी फोडत संघाला पहिले यश मिळवून दिले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर  १३ व्या षटकात वरुण चक्रवर्ती २ चेंडूत २ विकेट्स घेत यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्यांदा हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर पोहचला होता. पुन्हा एकदा त्याची हॅटट्रिकची संधी हुकली,  पण त्याने ३ षटकात फक्त १४ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याशिवाय फलंदाजीत धमाका करणाऱ्या शिवम दुबेनं ३ षटकात ३५ धावा खर्च करत २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. 

धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ कमी पडला, पण...

नेदरलँड्सच्या संघाने आपल्या अखेरच्या सामन्यात धमक दाखवली. पण बास डी लिड याने २३ चेंडूत केलेल्या ३३ धावा या संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. भारतीय गोलंदाजांसमोर एकही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकला नाही. त्यामुळे भारतीय संघाने सेट केलेल्या धावांचा पाठलाग करताना त्यांना फक्त १७६ धावांपर्यंतच मजल मारता आली. या असोसिएट संघासाठी एकच गोष्ट जमेची बाजू ठरली ती म्हणजे त्यांनी ७ विकेट्स गमावत २० षटके खेळून काढली.    

English
हिंदी सारांश
Web Title : India undefeated! Dominates Netherlands, extends world record in ICC events.

Web Summary : India defeated Netherlands in T20 World Cup, securing their 17th consecutive ICC win. Dube's explosive batting and Chakravarthy's spin led India to victory, setting up a Super 8 showdown after an unbeaten group stage.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६