PAK vs ENG : "ये जोफ्रा का स्टाईल है..." Saim Ayub ची विकेट घेतल्यावर आर्चरचं खास सेलिब्रेशन चर्चेत

 १४५ kph वेगाने टाकलेल्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर करेक्ट कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 20:31 IST2026-02-24T20:20:31+5:302026-02-24T20:31:09+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup 2026 PAK vs ENG Jofra Archer Once Again Came Up With Savage Celebration Meaning After Saim Ayub Wicket Watch Video | PAK vs ENG : "ये जोफ्रा का स्टाईल है..." Saim Ayub ची विकेट घेतल्यावर आर्चरचं खास सेलिब्रेशन चर्चेत

PAK vs ENG : "ये जोफ्रा का स्टाईल है..." Saim Ayub ची विकेट घेतल्यावर आर्चरचं खास सेलिब्रेशन चर्चेत

Jofra Archer Celebration vs Saim Ayub :  टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील दुसऱ्या गटातील इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात श्रीलंकेच्या पल्लेकेलेच्या मैदानात सामना रंगला आहे. पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. साहिबजादा फरहान आणि सईम अयूब या जोडीनं पाकिस्तानच्या डावाची सुरुवात केली. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरनं तिसऱ्याच षटकात ही जोडी फोडली. पाकिस्तानच्या धावफलकावर १४ धावा मोठा फटका खेळण्याचा नादात पाकिस्तानच्या युवा सलामीवीराचा सय्यम सुटला अन् तो जोफ्राच्या जाळ्यात फसला. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

 १४५ kph वेगाने टाकलेल्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर करेक्ट कार्यक्रम

जोफ्रा आर्चनं इंग्लंडच्या संघाकडून पहिले षटक टाकले. या षटकातील अखेरच्या चेंडूवर सईम अयूबनं त्याला खणखणीत चौकार मारला होता. संघाच तिसरं आणि आपले दुसरे षटक घेऊन आल्यावर जोफ्रानं चौकार मारल्याचा बदला घेण्यासाठी वेगवान शॉर्ट बॉलची ट्रिक आजमावली. १४५ kph वेगाने आलेला चेंडूवर सईम अयूबने पूल शॉट खेळला. पण तो टायमिंग करू शकला नाही. जेकब बेथेल याने कोणतीही चूक न करता त्याचा झेल टिपला. सईम अयूबच्या खेळीला अवघ्या ७ धावांवर ब्रेक लागला. 

विकेट मिळताच जोफ्रानं खास सेलिब्रेशनसह लुटली मैफील

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जोफ्रा आर्चर आपल्या खास सेलिब्रेशनमुळे लक्षवेधून घेताना दिसत आहे. सईम अयूबची विकेट घेतल्यावर पुन्हा एकदा त्याच्या सिग्नेचर स्टाईल सेलिब्रेशनची खास झलक पाहायला मिळाली. विकेट घेतल्यावर जोफ्रा आर्चर याने हाताचा C आकार करून दाखवताना दिसला. आता त्याचा अर्थ गोलंदाजीतील क्लास घायचा की, यात आणखी काही दडलंय ते जोफ्रालाच माहिती, पण सध्या त्याची ही युनिक स्टाईल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.  इंग्लंडच्या जलदगती गोलंदाजाने  पाकिस्तानला पहिला धक्का दिल्यावर स्टँडमध्ये बसलेल्या चाहत्याची रिअ‍ॅक्शनही बघण्याजोगी होती. 

Web Title: ICC T20 World Cup 2026 PAK vs ENG Jofra Archer Once Again Came Up With Savage Celebration Meaning After Saim Ayub Wicket Watch Video