NZ vs ENG, Super 8 Match And Pakistan New Zealand T20WC 2026 Semifinal Scenario : आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर-८ फेरीतील दुसऱ्या गटात शुक्रवारी, २७ फेब्रुवारीला न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना रंगणार आहे. कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणारा हा न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच स्पर्धेतील भविष्य ठरवणारा असेल. इंग्लंडच्या संघाने श्रीलंकेला पराभूत करत सलग दोन विजयासह यंदाच्या हंगामात सर्वात आधी सेमीफायनल गाठली आहे. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाला हा सामना जिंकून ५ गुण खात्यात जमा करत सेमीच तिकीट बूक करण्यासह आपल्या गटात अव्वल होण्याची संधी आहे. इथं जाणून घेऊयात न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्यात तिसरा सेमीफायनलिस्ट मिळणार का? या निकालाचा पाकिस्तानच्या संघावर काय परिणाम होईल यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पाकिस्तान मैदानात उतरण्याआधीच स्पर्धेबाहेर होणार? न्यूझीलंडसाठी सेमीचं समीकरण काय?
यंदाच्या हंगामातील सुपर ८ फेरीतील दुसऱ्या गटात न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्याची वेळ आली होती. या सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळाला. त्यानंतर पाकिस्तानच्या संघाने इंग्लंडविरुद्धचा सामना गमावला. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंकेविरुद्ध ६१ धावांच्या विजयासह निव्वळ धावगती +३.०५० वर पोहचवली आहे. इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकला तर ५ गुणांसह न्यूझीलंड या गटातून सेमीच तिकीट पक्के करेल. त्यांच्या विजयासह या फेरीतील अखेरच्या सामन्यासाठी मैदानात उतरण्याआधीच पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.
IND vs ZM : "आम्ही सर्वजण..." मॅचचा हिरो ठरल्यावर हार्दिक पांड्याने शेअर केली ड्रेसिंगरुममधील 'ती' गोष्ट
न्यूझीलंडच्या संघाने सामना गमावला तरी ते पाकिस्तानपेक्षा सेफ, कारण...
पाकिस्तानचा संघ -०.४६१ धावगतीसह तिसऱ्या स्थानावर आहे. ते अजूनही सेमीफायनलच्या शर्यतीत आहेत. पण न्यूझीलंडच्या संघाच्या पराभवासह त्यांना श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय नोंदवण्याचे आव्हान आहे. त्यामुळे जरी न्यूझीलंडचा संघाने इंग्लंडविरुद्ध पराभूत झाला तरी त्यांची डाळ शिजणं मुश्किल आहे. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघाला फक्त मोठ्या फरकाने पराभूत होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कर्णधार मिचेल सँटनरसह रचिन रविंद्र, ग्लेन फिलिप्स आणि कोल मॅककॉन्ची यांच्या फिरकीच्या जोरावर न्यूझीलंडचा संघ इंग्लंडला बॅकफूटवर ढकलू शकतो. न्यूझीलंड जिंकला तर या गटातील पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातील मॅचला अर्थच उरणार नाही.