IND vs PAK : तुक्का लागला? पहिल्याच षटकात अभिषेक शर्माची विकेट अन् रोहित शर्माचा चेहरा पडला

अभिषेक शर्माची विकेट पडल्यावर सोशल मीडियावर रोहित शर्माची रिअ‍ॅक्शन व्हायरल होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 19:28 IST2026-02-15T19:23:29+5:302026-02-15T19:28:27+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup 2026 IND vs PAK Rohit Sharma Disappointed After Salman Agha Take Wicket Of Abhishek Sharma First Over | IND vs PAK : तुक्का लागला? पहिल्याच षटकात अभिषेक शर्माची विकेट अन् रोहित शर्माचा चेहरा पडला

IND vs PAK : तुक्का लागला? पहिल्याच षटकात अभिषेक शर्माची विकेट अन् रोहित शर्माचा चेहरा पडला

IND vs PAK, Salman Agha Take Wicket Of Abhishek Sharma First Over : कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान अली आगानं सरप्राइजवर सरप्राइज दिल्याचे पाहायला मिळाले. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याऐवजी त्याने आधी गोलंदाजी करण्याला पसंती दिली. त्यानंतर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच तो स्वत: पहिलं षटक घेऊन गोलंदाजीला आला. या षटकात त्याने अभिषेक शर्माच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का दिला. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यातही अभिषेक शर्मावर खाते उघडण्याआधी तंबूत परतण्याची वेळ आली. त्याची विकेट पडल्यावर रोहित शर्माचा चेहरा पडल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर रोहित शर्माची रिअ‍ॅक्शन व्हायरल होत आहे. 

 टीम इंडियाला पहिला धक्का बसला हा एक तुक्का?

सलमान अली आगा हा काही नियमित गोलंदाज नाही. त्यामुळे त्याने पहिले षटक टाकायला पुढे येणं हा एक प्रकारचा जुगारच होता. त्यामुळे त्याला जी विकेट मिळाली हा तुक्का आहे का? असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. दुसरीकडे भारतीय संघाने पहिल्या षटकात पहिली विकेट गमावल्यावर रोहित शर्माचा चेहरा पडल्याचे पाहायला मिळाले. गत हंगामात टीम इंडियाला जेतपद मिळून देणारा रोहित शर्मा हा यंदाच्या हंगामातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा ब्रँड अँम्बेसिडर आहे. भारत-पाक यांच्यातील सामन्यासाठी तो कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर उपस्थिती आहे. 

Web Title : IND vs PAK: शर्मा का विकेट गिरा; रोहित शर्मा की प्रतिक्रिया वायरल।

Web Summary : भारत-पाकिस्तान के हाई-वोल्टेज मुकाबले में सलमान आगा ने पहले ओवर में अभिषेक शर्मा का विकेट लेकर चौंका दिया। शुरुआती नुकसान के बाद रोहित शर्मा की निराश प्रतिक्रिया वायरल हो गई। क्या यह किस्मत थी?

Web Title : IND vs PAK: Sharma's wicket falls; Rohit Sharma's reaction goes viral.

Web Summary : In the high-voltage India-Pakistan match, Salman Agha surprised by taking Abhishek Sharma's wicket in the first over. Rohit Sharma's disappointed reaction went viral after the early loss. Was it luck?