IND vs PAK Ishan Kishan Slams Half-Century Against Pakistan : भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकात अभिषेक शर्माच्या रुपात पहिली विकेट गमावली. पण त्यानंतर ईशान किशन याने आपल्या फलंदाजीतील शानदार शो दाखवून दिला. त्याने दबावात तुफान फटकेबाचीचा नजराणा पेश करत अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याची ही खेळी टीम इंडियाला मोठा दिलासा देणारी आणि पाकिस्तानी गोलंदाजांचे खांदे पाडणारी अशी आहे. या खेळीसह त्याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. एवढेच नाही तर भारत-पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामन्यात त्याच्या भात्यातून तिसरे जलद अर्धशतक पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शतकी डाव साधण्याची होती संधी, पण...
भारतीय संघाने पहिल्या षटकात पहिली विकेट गमावल्यावरही ईशान किशन याने आपल्या नैसर्गिक धाटणीत तुफान फटकेबाजी करत पाकिस्तानी गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. तो शतकी खेळीसह मोठा धमाका करेल, असे चित्र निर्माण झाले असताना भारताच्या डावातील ९ व्या षटकात सईम अयूबच्या चौथ्या चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. ८८ धावांवर भारताने ही विकेट गमावली. त्याने ४० चेंडूत ७७ धावा केल्या.
IND vs PAK : तुक्का लागला? पहिल्याच षटकात अभिषेक शर्माची विकेट अन् रोहित शर्माचा चेहरा पडला
किंग कोहलीसह गंभीरच्या पंक्तींत एन्ट्री
ईशान किशन याने ७७ धावांच्या खेळीसह विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या खास पंक्तीत एन्ट्री मारली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील टी-२० सामन्यातील त्याची ही खेळी चौथ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. या यादीत विराट कोहली नाबाद ८२ धावांसह अव्वलस्थानी आहे. त्यापाठोपाठ मोहम्मद रिझवानचा नंबर लागतो.
भारत-पाकिस्तान टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांतील सर्वोच्च वैयक्तिक धावा
- ८२ धावा* – विराट कोहली, मेलबर्न, २०२२
- ७९ धावा* – मोहम्मद रिझवान, दुबई, २०२१
- ७८ धावा* – विराट कोहली, आर. प्रेमदासा स्टेडियम (कोलंबो), २०१२
- ७७ धावा – ईशान किशन, आर. प्रेमदासा स्टेडियम (कोलंबो), २०२६
- ७५ धावा – गौतम गंभीर, जोहान्सबर्ग, २००७
भारत-पाकिस्तान टी२० मधील सर्वात जलद ५० (चेंडूनुसार)
- २३ मोहम्मद हाफीज अहमदाबाद २०१२
- २४ अभिषेक शर्मा दुबई २०२५
- २७ इशान किशन कोलंबो आरपीएस २०२६ *
- २९ युवराज सिंग अहमदाबाद २०१२