Sanju Samson : संजू सॅमसनचा धमाका; सलग दुसऱ्या अर्धशतकासह वानखेडेवरही लुटली मैफील

झेल सुटला अन् संजूची बॅट पुन्हा तळपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:53 IST2026-03-05T19:50:38+5:302026-03-05T19:53:09+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup 2026 Harry Brook Gives Lifeline Sanju Samson Smashed Fifty In Semifinals Against England Including 3 Sixes And 7 Fours With Strike Rate Of 200 | Sanju Samson : संजू सॅमसनचा धमाका; सलग दुसऱ्या अर्धशतकासह वानखेडेवरही लुटली मैफील

Sanju Samson : संजू सॅमसनचा धमाका; सलग दुसऱ्या अर्धशतकासह वानखेडेवरही लुटली मैफील

ICC T20 World Cup 2026 Harry Brook Gives Lifeline Sanju Samson Smashed Fifty : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील लढतीत संजू सॅमसन याने अर्धशतक झळकावत खास विक्रमाला गवसणी घातली. हॅरी ब्रूकनं एक सोपा झेल सोडल्यावर मिळालेल्या संधीच सोनं करताना  संजू सॅमसन याने २६ चेंडूत अर्धशतक साजरे केले. यंदाच्या हंगामातील सलग दुसऱ्या सामन्यात त्याने झळकावलेले हे दुसरे अर्धशतक ठरले. याआधी वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद ९७ धावांची खेळी साकारली होती.    

हॅरी ब्रूकनं कॅच सोडला अन्...

संजू सॅमसन याने अभिषेक शर्माच्या साथीनं भारतीय संघाच्या डावाला धमाकेदार अंदाजात सुरुवात केली. जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच षटकात १२ धावा कुटत त्याने पुन्हा धमाका करणार याचे संकेत दिले.  धावफलकावर २० धावा असताना अभिषेक शर्माच्या रुपात दुसऱ्याच षटकातच टीम इंडियाला पहिला धक्का बसला. पण त्यानंतर संजू सॅमसन याने आपली दमदार खेळी कायम ठेवली. भारताच्या डावातील तिसऱ्या षटकात ६ चेंडूत १५ धावांवर असताना इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर संजूचा एक एक सोपा झेल टिपला. त्यानंतर संजूने तुफान फटकेबाजीचा वेग आणखी वाढवला अन् अवघ्या २६ चेंडूत अर्धशतक साजरे केले.

शतकाची होती संधी, पण...

संजू सॅमसन याने इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये ४२ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने २११ च्या स्ट्राईक रेटनं ८९ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजविरुद्ध धावांचा पाठलाग करत असताना त्याचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले होते. इंग्लंडविरुद्ध तो हा डाव साधण्याच्या अगदी जवळ पाहचला होता. पण विल जॅक्सने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. त्याचे शतक अवघ्या ११ धावांनी हुकले. सेमीफायनलमधील त्याची ही खेळी टीम इंडियाला मोठा दिलासा देणारी अशीच आहे.

Web Title : संजू सैमसन ने फिर जड़ा अर्धशतक, वानखेड़े में बिखेरा जलवा

Web Summary : वानखेड़े में इंग्लैंड के खिलाफ संजू सैमसन ने शानदार अर्धशतक बनाया। कैच छूटने का फायदा उठाते हुए, उन्होंने सिर्फ 26 गेंदों में अर्धशतक पूरा किया। इस सीज़न में यह उनका लगातार दूसरा अर्धशतक है, इससे पहले वेस्टइंडीज के खिलाफ 97 रन बनाए थे।

Web Title : Sanju Samson Smashes Another Fifty, Shines at Wankhede Stadium

Web Summary : Sanju Samson hit a blistering half-century against England at Wankhede. Capitalizing on a dropped catch, he reached fifty in just 26 balls. This marks his second consecutive half-century this season, following a 97-run innings against the West Indies.