New Zealand vs Sri Lanka, 46th Match, Super 8 Group 2 : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील दुसऱ्या गटातील न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील 'करो वा मरो'ची लढत कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडचा संघ दुश्मंत चमीराची गती आणि महीश तीक्षणाच्या फिरकीसमोर अडचणीत सापडला होता. पण अखेरच्या षटकात कोल मॅककॉन्ची आणि कर्णधार मिचेल सँटनर यांनी केलेल्या दमदार भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने दमदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
१२ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर ८४ धावांवर न्यूझीलंडच्या संघाने ६ विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर मॅककॉन्ची आणि कर्णधार मिचेल सँटनर दोघांनी सातव्या विकेटसाठी ४७ चेंडूत ८४ धावांची दमदार भागीदारी रचली. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील सातव्या विकेटसाठी ही विक्रमी भागीदारी ठरली. मिचेल सँटनरनं २६ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४७ धावांचे योगदान दिले. दुसरीकडे ल मॅककॉन्ची २३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३१ धावांची नाबाद खेळी साकरली. या जोडीनं केलेल्या कमालीच्या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १६८ धावा करत श्रीलंकेसमोर १६९ धावांचे टार्गेट सेट केले आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेच्या संघाला या धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पार करण्याचे आव्हान आहे.
जलवा है हमारा... कर्णधार बनताच अमेलियाचं टी२०मध्ये पहिलं शतक, बाऊंड्रीने केल्या 'इतक्या' धावा
घरच्या मैदानावर श्रीलंकन कर्णधाराने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चमीरानं न्यूझीलंडच्या विकेट किपर बॅटर टिम सिफर्टला अवघ्या ८ धावांवर तंबूचा रस्ता दाखवत संघाला पहिले यश मिळवून दिले. फिन एलनही १३ चेंडूत २३ धावांवर तीक्षणाच्या फिरकीत फसला. सेट झालेल्या रचिन रविंद्रला २२ चेंडूत ३२ धावांवर बाद करत तीक्षणाने न्यूझीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. ग्लेन फिलिप्स १८ (१८) , डेरिल मिचेल ३ (७) स्वस्तात माघारी फिरल्यावर मार्क चॅपमन खातेही न उघडता माघारी फिरल्यावर न्यूझीलंचा संघ बॅकफूटवर होता. श्रीलंकेच्या संघाकडून तीक्षणा आणि चमीरा यांनी प्रत्येकी ३-३ तर दुनित वेल्लालागे याने एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.