ICC T20 World Cup 2024 IND vs PAK Live Scorecard - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याची उत्सुकता फक्ता आशियाई लोकांमध्येच नाही, तर कॅनडामधील सेलिब्रिटींनाही आहे. यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होत असल्याने, ICCने नवीन प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. कॅनेडियन रॅपर आणि गायक ड्रेकने भारतीय संघावर ५ कोटींचा सल्ला लावला आहे.
भारत-पाकिस्तान सामना अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल. या सामन्याच्या एक तास आधी न्यूयॉर्कमध्ये सकाळी ९ वाजता हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस जास्त काळ टिकणार नाही आणि येणार आणि जाणार आहे, तर सामन्याच्या वेळी पावसाची शक्यता नाही.
ड्रेकने क्रिकेट सामन्यावर सट्टा लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने इंडियन प्रीमियर लीग फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) वरील सट्टेबाजीतून ३.७३ कोटी कमावल्याचा दावा Mashable Indiaने केला आहे. गायकाने शाहरुख खानच्या टीमवर $2,50,000 ची बेट लावली होती आणि सट्ट्यातून त्याने १.७ कोटींचा नफा कमावला होता.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूयॉर्कमध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात आयर्लंडचा आठ विकेट्सनी पराभव केला होता . यानंतर टीम इंडियाला विजयाची मालिका कायम ठेवायची आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानची सुरुवात चांगली झालेली नाही. अमेरिकेविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. बाबर आजमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला प्रत्येक परिस्थितीत पलटवार करून चाहत्यांचा विश्वास जिंकायचा आहे. त्याचबरोबर टीम इंडियालाही पाकिस्तानवर आपला दबदबा कायम ठेवायला आवडेल. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात भारताने आतापर्यंत पाकिस्तानला सातपैकी सहा सामन्यात पराभूत केले आहे.