Join us

T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : एक तास शिल्लक अन् पावसाची एन्ट्री! न्यू यॉर्कवरून Live Video 

ICC T20 World Cup 2024 IND vs PAK Live Scorecard - भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्यास १ तास शिल्लक राहिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 19:08 IST

Open in App

ICC T20 World Cup 2024 IND vs PAK Live Scorecard - भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्यास १ तास शिल्लक राहिला आहे. दोन्ही संघ न्यूयॉर्क येथील स्टेडियमवर पोहोचले आहेत. दोन्ही संघांचे समर्थकही आता गर्दी करू लागले आहेत. युवराज सिंग व शाहीद आफ्रिदी हे दोन अॅम्बेसिडरही स्टेडियमवर पोहोचले आहेत, परंतु त्यांच्या उत्साहावर पाणी फिरवणारे दृश्य समोर आले आहेत. न्यू यॉर्क येथे पाऊस सुरू झाला आहे आणि त्यामुळे खेळपट्टी झाकली गेली आहे. त्यामुळे कदाचित नाणेफेकीला विलंब होऊ शकतो. 

भारत-पाकिस्तान यांच्यातला हायव्होल्टेज सुरू होणार आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील या सामन्याची सर्व जगाला उत्सुकता आहे, तर प्रथमच अमेरिकेत होत असलेल्या आयसीसी स्पर्धेमुळे तेथील चाहतेही या लढतीसाठी सज्ज आहेत. भारताने आतापर्यंत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सातपैकी सहा सामन्यांत बाजी मारली आहे. भारताने पहिल्या सामन्यात आयर्लंडवर विजय मिळवून दमदार सुरुवात केली आहे, तेच पाकिस्तानला नवख्या अमेरिकेकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. 

रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता फार कमी आहे, परंतु पावसाचा अंदाज पाहता तो शिवम दुबेच्या जागी फिरकीपटू कुलदीप यादव किंवा युझवेंद्र चहलला संधी देऊ शकतो. तेच बाबर आजम यष्टिरक्षक आजम खान याला बाकावर बसवण्याच्या तयारीत असल्याचे कळतेय. इमाद वासीमला तंदुरुस्त जाहीर करण्यात आल्याने तो आज प्लेइंगपेइलेव्हनमध्ये दिसेल. नेदरलँड्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना काल ज्या खेळपट्टीवर खेळला गेला, त्यावरच INDvsPAK लढत होणार आहे. त्यामुळे मोठी धावसंख्येची अपेक्षा कमी आहे.

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारत विरुद्ध पाकिस्तान