ICC T20 World Cup 2024 IND vs IRE Live Scorecard - टीम इंडिया न्यू यॉर्कमधील नासाऊ कौंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आयर्लंडविरुद्ध लढणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ या स्पर्धेत त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी विजयी सुरुवात करेल. त्यानंतर टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे या सामन्यातील विजय हा भारतीय संघाचे मनोबल उंचावणारा असेल.
भारताचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माआयर्लंडविरुद्धच्या सलामीच्या लढतीत MS Dhoni चा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने ४१ सामने जिंकले आहेत, जे धोनीच्या बरोबरीचे आहेत. भारताने आयर्लंडविरुद्धचा सलामीचा सामना जिंकला तर रोहितच्या नेतृत्वाखालील हा ४२ वा विजय असेल. धोनीच्या नेतृत्वाखालील भारताने ७२ पैकी ४१ ट्वेंटी-२० सामने जिंकले, तर रोहितने कर्णधार म्हणून केवळ ५५ सामन्यात मोठा पराक्रम करण्याच्या मार्गावर आहे. मात्र, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा धोनी हा एकमेव भारतीय कर्णधार होता.
तेच दुसरीकडे भारताचा महान फलंदाज
विराट कोहली आयपीएलच्या नुकत्याच संपलेल्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि तो एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याला दोनदा (२०२४-२०१६) प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळाला. कोहलीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक ११४१* धावा केल्या आहेत. भारताच्या माजी कर्णधाराने २७ सामन्यांमध्ये १०३ चौकार मारले आहेत आणि तो श्रीलंकेचा महान खेळाडू माहेला जयवर्धनेचा विक्रम मोडण्यापासून फक्त ९ चौकार दूर आहे. श्रीलंकन खेळाडूने ३१ सामन्यांत १११ चौकार मारले आहेत.
भारत आणि आयर्लंड यांनी एकमेकांविरुद्ध आठ सामने खेळले असून त्यापैकी सात जिंकून भारताने आघाडी घेतली आहे आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. भारत आणि आयर्लंड यांच्यातील शेवटचा सामना २०२३ मध्ये झाला होता, ज्यामध्ये भारताने आयर्लंडचा ३३ धावांनी पराभव केला होता.