ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live: इंग्लंडनं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; द.आफ्रिकेला शेवटची संधी

ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज शारजाच्या स्टेडियमवर होत असलेल्या इंग्लंड विरुद्ध द.आफ्रिका सामन्याची नाणेफक इंग्लंडनं जिंकली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 07:13 PM2021-11-06T19:13:32+5:302021-11-06T19:13:57+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 World Cup 2021 ENG vs SA Live updates England win toss bowling first Last chance for South Africa | ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live: इंग्लंडनं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; द.आफ्रिकेला शेवटची संधी

ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live: इंग्लंडनं नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; द.आफ्रिकेला शेवटची संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup 2021, ENG vs SA, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज शारजाच्या स्टेडियमवर होत असलेल्या इंग्लंड विरुद्ध द.आफ्रिका सामन्याची नाणेफक इंग्लंडनं जिंकली आहे. इंग्लंडनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सुपर-१२ मधील पहिल्या गटात इंग्लंडचा संघ ८ गुणांसह पहिल्या स्थानावर असून शेवटचा सामनाही जिंकून विजयी रथ कायम ठेवण्याचा संघाचा प्रयत्न असणार आहे. तर दुसरीकडे द.आफ्रिकेला उपांत्य फेरीतील आपली दावेदारी सिद्ध करण्यासाठी आज मोठ्या फरकानं इंग्लंड विरुद्धचा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे आजचा सामना द.आफ्रिकेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. 

द.आफ्रिकेच्या खात्यात ६ गुण असून आजचा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाच्या गुणांची बरोबरी संघाला करता येणार आहे. यात जर द.आफ्रिकेनं चांगल्या नेट रनरेटनं आजचा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियाचा धक्का देण्याची संधी द.आफ्रिकेकडे आहे. आता द.आफ्रिकेचा संघ आजच्या शेवटच्या संधीचा फायदा करुन घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.  

Web Title: ICC T20 World Cup 2021 ENG vs SA Live updates England win toss bowling first Last chance for South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.