ICC T20 World Cup 2021, AUS vs WI, Live: कांगारुंचा कॅरेबियन्सवर दिमाखदार विजय, उपांत्य फेरीची दावेदारी केली बळकट

ICC T20 World Cup 2021, AUS vs WI, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आज अबूधाबीच्या स्टेडियमवर ऑस्टेलियानं वेस्ट इंडिजला ८ विकेट्सनं पराभूत करत उपांत्य फेरीसाठीची आपली दावेदारी आणखी बळकट केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 07:01 PM2021-11-06T19:01:05+5:302021-11-06T19:01:34+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 World Cup 2021 AUS vs WI Live updates australia beat west indies by 8 wickets | ICC T20 World Cup 2021, AUS vs WI, Live: कांगारुंचा कॅरेबियन्सवर दिमाखदार विजय, उपांत्य फेरीची दावेदारी केली बळकट

ICC T20 World Cup 2021, AUS vs WI, Live: कांगारुंचा कॅरेबियन्सवर दिमाखदार विजय, उपांत्य फेरीची दावेदारी केली बळकट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup 2021, AUS vs WI, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आज अबूधाबीच्या स्टेडियमवर ऑस्टेलियानं वेस्ट इंडिजला ८ विकेट्सनं पराभूत करत उपांत्य फेरीसाठीची आपली दावेदारी आणखी बळकट केली आहे. तर वेस्ट इंडिजचं स्पर्धेतील आव्हान अवघ्या २ गुणांवरच संपुष्टात आलं आहे. ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिजच्या संघानं दिलेलं १५८ धावांचं आव्हान १७ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गाठलं. 

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. वॉर्नरनं ५६ चेंडूत नाबाद ८९ धावांची खेळी साकारुन संघाला विजय प्राप्त करुन दिला. यात ४ उत्तुंग षटकार आणि ९ चौकारांचा समावेश आहे. कर्णधार अरोन फिंच (९) स्वस्तात बाद झाला. पण मिचेल मार्शनं वॉर्नरला सुरेख साथ देत अर्धशतकी खेळी साकारली. मिचेल मार्शनं ३२ चेंडूत २ षटकार आणि पाच चौकारांच्या साथीनं ५३ धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. 

ऑस्ट्रेलियानं आजच्या सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजला २० षटकांच्या अखेरीस ७ बाद १५७ धावा करता आल्या आहेत. वेस्ट इंडिजकडून कर्णधार कायरन पोलार्डनं सर्वाधिक ४४ धावा केल्या. तर एवन लुईसनं २९ धावांचं योगदान दिलं. ऑस्ट्रेलियानकडून जोश हेजलवूडनं अचूक मारा करत वेस्ट इंडिजच्या ४ फलंदाजांना माघारी धाडलं. तर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि अॅडम झॅम्पा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली होती. पहिल्या षटकात ४ धावा आल्या होत्या. पण दुसऱ्या षटकात २० धावा कुटल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजनं आता आक्रमक पवित्रा धारण केलाय असं दिसू लागलं असतानाच पुढच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात ख्रिस गेल बाद झाला. त्यानंतर चौथ्या षटकात वेस्ट इंडिजला लागोपाठ दोन धक्के बसले. निकोलस पुरन आणि रोस्टन चेज स्वस्तात माघारी परतले. शिमरन हेटमायर (२७) आणि कर्णधार पोलार्डनं (४४) संघाचा डाव सावरला. अखेरच्या षटकांमध्ये आंद्र रसेलनं ७ चेंडूत नाबाद १८ धावांची खेळी साकारुन संघाला १५० टप्पा ओलांडून दिला. 

Web Title: ICC T20 World Cup 2021 AUS vs WI Live updates australia beat west indies by 8 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.