T20 World Cup 2021 Aus vs SA Live Score: असं बाद होणं कुणाच्याही वाट्याला नको येऊदे!; Quinton de Kock ची विकेट पाहून तुम्हालाही असंच वाटेल, Video

T20 World cup 2021, Aus vs SA- २०१६ नंतर ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-२० संघात प्रथमच मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे त्रिकुट एकत्र खेळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 04:15 PM2021-10-23T16:15:02+5:302021-10-23T16:25:00+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 World Cup 2021 Aus vs SA Live updates : Quinton de Kock got out in an unwanted fashion, Watch Video | T20 World Cup 2021 Aus vs SA Live Score: असं बाद होणं कुणाच्याही वाट्याला नको येऊदे!; Quinton de Kock ची विकेट पाहून तुम्हालाही असंच वाटेल, Video

T20 World Cup 2021 Aus vs SA Live Score: असं बाद होणं कुणाच्याही वाट्याला नको येऊदे!; Quinton de Kock ची विकेट पाहून तुम्हालाही असंच वाटेल, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup 2021 Australia vs South Africa Scoreacard Live updates : ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या Super 12 सामन्यांचा थरार आजपासून सुरू झाला. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेताना दक्षिण आफ्रिकेला कोंडीत पकडले. कर्णधार अ‍ॅरोन फिंचनं दुसऱ्याच षटकात ग्लेन मॅक्सवेलला पाचारण केलं अन् त्यानं कमाल केली. त्यानंतर जोश हेझलवूडनं दोन धक्के देत दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर फेकले. सलामीवीर क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock ) विचित्र पद्धतीनं बाद झाला आणि सोशल मीडियावर चर्चेला विषय मिळाला. T20 World Cup 2021 Aus vs SA Scorecard:

T20 World cup 2021, Aus vs SA- २०१६ नंतर ऑस्ट्रेलियाच्या ट्वेंटी-२० संघात प्रथमच मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे त्रिकुट एकत्र खेळत आहे. कर्णधार टेम्बा बवुमा यानं आफ्रिकेला स्फोटक सुरुवात करून दिली. त्यानं मिचल स्टार्कनं टाकलेल्या पहिल्याच षटकात दोन सुरेख चौकार खेचले. बवुमा ६ चेंडूं १२ धावांवर खेळत असताना मॅक्सवेलनं टाकलेल्या चेंडूनं कमी उसळी घेतली आणि थेट यष्टिंचा वेध घेतला. बवुमाला तो चेंडू समजलाच नाही. त्यानंतर हेझलवूडनं पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रॅसी व्हॅन डेर ड्युसेनला ( २) यष्टिरक्षक मॅथ्यू वेड करवी झेलबाद केले. ड्युसेननं सराव सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते. T20 World Cup 2021 Aus vs SA live Score:

क्विंटन एकाबाजूनं खिंड लढवत होता, परंतु त्याचीच विकेट चर्चेचा विषय ठरतेय. हेझलवूडच्या चेंडूवर तिन्ही स्टम्प सोडून स्कूप मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् हवेत झेपावलेला चेंडू एक टप्पा घेत यष्टिंवर आदळला. क्विंटन ७ धावांवर बाद झाला. हेनरिच क्लासेन ( १३) याला पॅट कमिन्सन माघारी पाठवून आफ्रिकेची अवस्था ४ बाद ४६ अशी केली. T20 world cup news in marathi, T20 World Cup Aus vs SA live scorecard

पाहा व्हिडीओ..


Web Title: ICC T20 World Cup 2021 Aus vs SA Live updates : Quinton de Kock got out in an unwanted fashion, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.