Join us  

T20 World Cup 2021 Aus vs SA Live Score: ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची सुरेख कामगिरी, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची हाराकिरी

ICC T20 World Cup 2021 Australia vs South Africa Scoreacard Live updates : सराव सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १९० धावांचे लक्ष्य पार करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची Super 12मधील पहिल्याच सामन्यात भंबेरी उडाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 5:16 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021 Australia vs South Africa Scoreacard Live updates : सराव सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १९० धावांचे लक्ष्य पार करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची Super 12मधील पहिल्याच सामन्यात भंबेरी उडाली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर नेमका कोणता फटका मारावा हे तर त्यांना समजत तर नव्हतेच, शिवाय त्यांच्याकडून चुकांवर चुका झाल्या. ऑसी गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना आफ्रिकेला सातत्यानं धक्का देण्याचे सत्र सुरूच ठेवले. त्यामुळे आफ्रिकेला मोठा पल्ला गाठताच आला नाही.  ( सामन्याचे पूर्ण धावफलक पाहण्यासाठी क्लिक करा) T20 World cup 2021, Aus vs SA- अबु धाबीच्या स्टेडियमवर रंगत असलेल्या या सामन्यात प्रेक्षकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखली जावी यासाठी आयोजकांनी एक भन्नाट आयडिया लढवली. प्रेक्षकांसाठी खास बॉक्स तयार करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून आफ्रिकेला प्रथम फलंदाजीला बोलावले. कर्णधार टेम्बा बवुमा यानं आफ्रिकेला स्फोटक सुरुवात करून दिली. त्यानं मिचल स्टार्कनं टाकलेल्या पहिल्याच षटकात दोन सुरेख चौकार खेचले. बवुमा ६ चेंडूं १२ धावांवर खेळत असताना मॅक्सवेलनं टाकलेल्या चेंडूनं कमी उसळी घेतली आणि थेट यष्टिंचा वेध घेतला. बवुमाला तो चेंडू समजलाच नाही. त्यानंतर हेझलवूडनं पुढच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रॅसी व्हॅन डेर ड्युसेनला ( २) यष्टिरक्षक मॅथ्यू वेड करवी झेलबाद केले. ड्युसेननं सराव सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते. T20 World Cup 2021 Aus vs SA live Score:

क्विंटन एकाबाजूनं खिंड लढवत होता, परंतु त्याचीच विकेट चर्चेचा विषय ठरतेय. हेझलवूडच्या चेंडूवर तिन्ही स्टम्प सोडून स्कूप मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् हवेत झेपावलेला चेंडू एक टप्पा घेत यष्टिंवर आदळला. क्विंटन ७ धावांवर बाद झाला. हेनरिच क्लासेन ( १३) याला पॅट कमिन्सन माघारी पाठवून आफ्रिकेची अवस्था ४ बाद ४६ अशी केली. डेव्हिड मिलर आणि एडन मार्कराम यांनी संघर्ष केला, परंतु त्यांची ३४ धावांची भागीदारी अॅडम झम्पानं संपुष्टात आणली. झम्पानं त्याच षटकात ड्वाईन प्रेटोइसला ( १) बाद केले. झम्पानं चौथं षटक पूर्ण करून २१ धावांत २ विकेट्स घेतल्या. ग्लेन मॅक्सवेलनंही २४ धावांत १ विकेट घेतली.  T20 world cup news in marathi, T20 World Cup Aus vs SA live scorecard   

मार्कराम चांगला खेळला, परंतु त्याला साजेशी साथ मिळाली नाही. तो ३६ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ४० धावांवर माघारी परतला. जोश हेझलवडूनं १९ धावांत २ विकेट्स घेतल्या. आफ्रिकेला शतकी पल्ला पार करण्यासाठी १८व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. आफ्रिकेला ९ बाद ११८ धावाच करता आल्या. मिचेल स्टार्कनं ३० धावांत २ विकेट्स घेतल्या. अबु धाबी येथे २०१२मध्ये इंग्लंडनं ६ बाद १२९ धावांचा ( वि. पाकिस्तान)  यशस्वी बचाव केला होता.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१आॅस्ट्रेलियाद. आफ्रिका
Open in App