टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात काही ना काही विक्रम प्रस्थापित होत आहेत. मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात धावांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. कॅरेबियन बॅटर्संनी आपली मसल पॉवर दाखवून देताना उत्तुंग फटकेबाजी करत टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ १०७ धावांनी कमी पडला. पण या पराभवातही त्यांनी वेस्ट इंडिजच्या साथीनं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
सामना एकतर्फी, पण षटकारांच्या आतषबाजीनं सामना ठरला खास
वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना एकतर्फी झाला. पण दोन्ही संघातील फलंदाजांनी उत्तुंग फटकेबाजीचा खास नजराणा पेश करत हा सामना खास ठरवला. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत जे घडलं नव्हते ते मुंबईतील वानखेडेच्या मैदानात पाहायला मिळाले. दोन्ही संघांतील बॅटर्संनी आपल्या पॉवरफुल फटकेबाजीच्या जोरावर नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
ZIM vs WI : कॅरेबियन फ्लेवरने वानखेडे दणाणलं; झिम्बाब्वेचा पराभव! टीम इंडियासाठी वाजली धोक्याची घंटा?
एका सामन्यात सर्वाधिक षटकारांचा विक्रम
वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यातील लढतीत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक षटकरांचा विक्रम नोंदवला गेला. वेस्ट वेस्ट इंडिजच्या संघाने आपल्या डावात तब्बल १९ षटकार ठोकत नेदरलँड्सच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. २०१४ च्या हंगामात नेदरलँड्सच्या संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत एका डावात १९ षटकार ठोकले होते. झिम्बाब्वेच्या संघातील बॅटर्संनी या सामन्यात १२ षटकार मारले. त्यामुळे एका सामन्यात ३१ षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाले. याआधी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील एका सामन्यात एवढे षटकार कोणीही मारलेले नाहीत. २०१४ च्या हंगामात आयर्लंड विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामन्यात ३० षटकार पाहायला मिळाले होते. १२ वर्षांचा हा विक्रम वानखेडेच्या मैदानात मोडीत निघाला.
वेस्ट इंडिजच्या संघाने उभारली होती दुसऱ्या क्रमांकाची विक्रमी धावसंख्या
झिम्बाब्वेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. कॅरेबियन संघाच्या सलामीवीरांना स्वस्तात माघारी धाडण्यात झिम्बाब्वेचे गोलंदाज यशस्वी ठरले. पण त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि रॉव्हमन पॉवेल यांच्यात तुफान फटकेबाजीसह लोअर ऑर्डर बॅटर्संनी केलेल्या पॉवर हिटिंग शोच्या जोरावर वेस्ट इंडिजच्या संघाने निर्धारित २० षटकात २५४ धावा केल्या. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. या स्पर्धेत सर्वाेच्च धावसंख्येचा विक्रम हा श्रीलंकेच्या नावे आहे. २००७ च्या हंगामात त्यांनी केनियाविरुद्ध २६० धावा ठोकल्या होत्या.