Join us
Daily Top 2Weekly Top 5

NZ vs CAN : कोण आहे Yuvraj Samra? कॅनेडियन शतकवीराचं सिक्सर किंग युवीशी आहे खास कनेक्शन

. कॅनडाच्या हा बॅटर मूळचा पंजाबचा आहे. एवढेच नव्हे तर त्याचा भारताचा सिक्सर किंग युवीशी खास कनेक्शन आहे. जाणून घेऊयात सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:26 IST

Open in App

T 20 World Cup 2026 NZ vs CAN Who Is Yuvraj Samra Create History With Maiden T20I Century : न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात युवराज सामरा याने ऐतिहासिक खेळी करताना ५८ चेंडूत शतक साजरे केले. या खेळीसह १९ वर्षीय डावखुऱ्या बॅटरनं टीृ-२० वर्ल्ड कप स्पर्धेत नवा इतिहास रचला आहे. असोसिएट देशांकडून वर्ल्ड कप स्पर्धेत शतक झळकवणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकवण्याचा विश्वविक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. कॅनडाच्या या स्फोटक युवा बॅटरटं भारताचा सिक्सर किंग युवीशी खास कनेक्शन आहे. जाणून घेऊयात सविस्तर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

 कॅनडाच्या युवा बॅटरची ऐतिहासिक सेंच्युरी!

युवराज सामरा याने न्यूझीलंडसारख्या तगडी संघाविरुद्ध टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऐतिहासिक शतक साजरे केले.  यंदाच्या हंगामातील हे दुसरे शतक ठरले. सामराने आपल्या आतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील १९ व्या सामन्यातील १८ व्या डावात ऐतिहासिक  शतक साजरे केले. सर्वात कमी वयात शतक झकवण्याचा पराक्रम करताना त्याने न्यूझीलंडविरुद्ध ६५ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ११० धावांची खेळी केली. यंदाच्या हंगामातील ही कोणत्याही बॅटरनं केलेली सर्वोच्च खेळी ठरली.

टी-२० विश्वचषकात शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू

  • १९ वर्षे १४१ दिवस - युवराज समरा (कॅनडा) विरुद्ध न्यूझीलंड, चेन्नई, २०२६* 
  • २२ वर्षे १२७ दिवस - अहमद शहजाद (पाकिस्तान) विरुद्ध बांगलादेश, मिरपूर, २०१४
  • २३ वर्षे १५६ दिवस - सुरेश रैना (भारत) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ग्रोस आयलेट, २०१०
  • २५ वर्षे ८३ दिवस - अ‍ॅलेक्स हेल्स (इंग्लंड) विरुद्ध श्रीलंका, चॅटोग्राम, २०१४
  • २५ वर्षे ३२७ दिवस - ग्लेन फिलिप्स (न्यूझीलंड) विरुद्ध श्रीलंका, सिडनी, २०२२ 

कोण आहे Yuvraj Samra? जाणून घ्या युवीसोबतचं त्याचं खास कनेक्शन

 

कॅनडाचा युवा बॅटर युवराज सिंग सामरा हा डावखुऱ्या हाताने खेळतो. तो मूळचा पंजाबचा आहे.  त्याच्या वडिलांनी त्याचे नाव युवराज सिंगच्या नावावरुनच ठेवले आहे.  ESPN क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत सामरानं यासंदर्भातील माहिती दिली होती. एवढेच नाही तर युवराज सिंग सारखे खेळावे,  त्याची कॉपी करावी,  यावर वडील सातत्याने जोर द्यायचे,  असा किस्साही त्याने शेअर केला होता. हा बॅटर IPL मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांपैकी एक आहे. सामरा याने सोशल मीडियाच्या माध्यमातून  युवीसोबतचा खास फोटो शेअर केल्याचेही पाहायला मिळाले होते. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Yuvraj Samra: Canadian centurion has special connection with Yuvraj Singh

Web Summary : Canadian batsman Yuvraj Samra, with roots in Punjab, scored a T20 World Cup century in 58 balls against New Zealand. His father named him after Indian cricketer Yuvraj Singh, hoping he would emulate the 'Sixer King's' playing style. He is the first from an associate nation to score a world cup century.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६