दुबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये दुस-या स्थानी कायम आहे. गोलंदाजीमध्ये मात्र आर. अश्विन सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारानेही आपले सहावे स्थान कायम राखले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार गोलंदाजी करणाºया आॅस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कला पाचव्या क्रमांकावर बढती मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम यानेही आपल्या स्थितीत सुधारणा करत १९ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ए.बी.डिव्हिलियर्स १२ व्या तर डिकॉक २२ व्या क्रमांकावर आहेत. केशव महाराज १८ स्थानी आहे.
शॉन आणि मिशेल या आॅस्टेÑलियाच्या मार्श बंधूंनीही क्रमवारीत प्रगती केली असून शॉनने फलंदाजीमध्ये १६ वे स्थान पटकावले आहे. त्याचवेळी मिशेलने ५६ स्थानावरुन ४३ व्या स्थानी झेप घेतली. विशेष म्हणजे दोन्ही भावंडांची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. (वृत्तसंस्था)