दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. कोहलीने ८८४ गुणांसह फलंदाजी क्रमवारीत पहिल्या तर उपकर्णधार रोहित शर्मा ८४२ गुणांसह दुसºया स्थानावर आहे. पहिल्या दहा फलंदाजांमध्ये शिखर धवन ८०२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह ७९७ गुणांसह पहिल्या तर फिरकीपटू कुलदीप यादव ७०० गुणांसह तिसºया क्रमांकावर आहे. दुसºया स्थानी अफगाणिस्तानच्या राशिद खाने याने ७८८ गुणांसह बाजी मारली. युजवेंद्र चहल पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहे. तो सध्या ११ व्या स्थानी आहे. भारतीय संघ टीम क्रमवारीत १२२ गुणांसह दुसºया स्थानी आहे. इंग्लंडने १२७ गुणांसह पहिले स्थान राखले आहे.
इग्लंडला हे स्थान वाचवण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवावा लागेल. जर इंग्लंडने ही मालिका गमावली तर भारताला नंबर वनचा ताज मिळू शकतो. भारत २१ आॅक्टोबरपासून वेस्टइंडिजविरुद्ध पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दोन्ही संघ मालिकेतील सर्व सामने जिंकले तर त्यांना प्रत्येकी एका गुणाचा फायदा होईल.